आढळगावात धारदार शस्त्राने गळा चिरून गुप्तांगावर वार करीत,युवकाची हत्या.अज्ञात इसमा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल..

दिनांक ३ मे (आढळगाव,श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील २८ वर्षीय युवकाची कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करीत,गळा चिरून गुप्तांगावर, छातीवर, हातावर जबरी वार करून खून केल्याची घटना घडली आहे. मुकुंद जयसिंग वाकडे असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याविषयी मिळालेली माहिती अशी की, काल दि २ मे रोजी रात्री ८ वा. चे सुमारास मयत मुकुंद हा त्याचे राहते घरुन ट्रॅक्टर चे सहाय्याने आढळगावचे शिवारातील शेती गट नं. १३३/१ मधील शेतातील डाळींबाचे पिकावर फवारणी करण्यासाठी गेला होता. रात्री ९:४५ वा. चे सुमारास मयताचे वडील, भाऊ, चुलत भाऊ असे आढळगाव गावचे शिवारातील घोडेगाव तलावावर मोटार चालु करण्यासाठी गेले होते. यावेळी तलावाकडे जाताना वडील जयसिंग यांनी मुकुंद यास पाईप लाईनचा वॉल फिरवण्यासाठी मोबाईलवरुन तीन ते चार वेळा फोन केला.परंतु, त्याने फोन उचलला नाही . म्हणुन, वडिलांनी आईस फोन करुन मुकुंद हा फोन उचलत नाही. तो फोन का उचलत नाही? याबाबत तु त्याचे जवळ जावुन पहा असे सांगीतले.

थोडया वेळात रात्री १०:१५ वा.चे सुमारास विजय लहानु वाकडे यांनी मुकुंदच्या गळयाला तार लागुन तो जखम झाल्याचे सांगितले. लगबगीने डाळींबाचे शेतात जावुन पाहीले असता,मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८) हा त्याचे गळयावर गंभीर जखम अवस्थेत मयत झाल्याचे घरच्यांचा निदर्शनास आला.

मुकुंद हा डांळीबाचे शेतात फवारणी करत असताना डांळीबाचे झाडे खाली वाकु नये म्हणुन, लावलेली तार त्याचे गळयाला गुंतुन, त्यात त्याचा गळा कापुन तो मयत झाला.असे घरच्यांना वाटल्याने,घरच्यांनी मुकुंद याचे प्रेत ग्रामीण रुग्णालय,श्रीगोंदा येथे आणले.त्यानंतर राजु नामदेव वाकडे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला याविषयी खबर दिली.

त्यानंतर आज दिनांक ३ मे रोजी सकाळी मयताच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा येथे येवून मुकुंदचे प्रेत पाहीले असता, त्याचे गळयावर , छातीवर डावे बाजुस , दोन्ही हातांवर , पंजावर, गुप्त अंगावर काहीतरी धारधार हत्याराने वार केल्याच्या गंभीर जखमा झाल्याचे दिसुन आल्याचे फिर्यादत नमूद केले आहे.

मुंकुंद जयसिंग वाकडे वय २८ वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरुन धारधार हत्याराने त्याचा गळा कापुन त्याचे , गुप्त अंगावर , छातीवर डावे बाजुस , हातावर , पंजावर वार करुन, जखमी करुन, त्याचा खुन केला असल्याची फिर्याद श्रीगोंदा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. त्यावरुन अज्ञात इसमावर गु.र.न.आय. ४१६/२०२० भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव, (पोलीस उपविभागीय अधिकारी) संजय सातव तसेच (अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी भेट दिली असून,पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विठ्ठल पाटिल करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading