श्री.संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सवासाठी शांतता समितीची बैठक २५ फेब्रुवारीला..

दिनांक २४ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:

श्री.संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता तहसिल कार्यालय, श्रीगोंदा येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा समिती, प्रतिष्ठित नागरिक, सर्व धर्मीय प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यात्रा उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि सर्व धार्मिक समुदायांमध्ये सौहार्दाचे वातावरण टिकवून ठेवावे, यासाठी ही बैठक घेतली जात आहे. यामध्ये यात्रा उत्सवातील कार्यक्रम, सुरक्षेची उपाययोजना, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थापन आदींबाबत चर्चा केली जाणार आहे.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सर्व नागरिक, यात्रा समिती सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून यात्रा उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडेल.

स्त्रोत:(पोलीस निरीक्षक)

Advertise…

Leave a Reply