श्रीगोंद्यातील मिसिंग महिलेचा साताऱ्याजवळ खून..! दोन आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या तपासातुन कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात..

दिनांक ६ जुन २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये दाखल मिसिंग प्रमाणे नमूद मिसिंग मधील महिला सुभद्रा राजेंद्र मुंढेकर, वय ४०, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, हिचा पोलीस शोध घेत असताना, सदरील महिलेच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता की, ती इसम नामे राजेंद्र देशमुख याच्या सोबत गेली असावी. त्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांचा तपास चालू असताना, तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित इसम राजेंद्र देशमुख, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, व बिभीषण चव्हाण, रा. बाभळगाव, ता. इंदापूर यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून अधिक चौकशी करण्यात आली.

चौकशीत त्यांनी सांगितले की, त्यांनी सातारा जवळ नमूद मिसिंग महिलेचा खून करून तिला कॅनॉलच्या पाण्यात टाकून दिले. त्या बाबत अधिक माहिती घेता, सदर मयत महिलेबाबत कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर बाबत कोरेगाव पोलीस स्टेशनला माहिती देऊन नमूद दोन्ही संशयित इसमांना कोरेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्याचे स्थानिक पोलीस यंत्रणेने सांगितले.

स्रोत:(अधीकृत माहितीनुसार)

जाहिरात..
जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading