काष्टी येथे हॉटेलमध्ये भांडणात चार जण जखमी..

दिनांक ६ जुन २०२४,श्रीगोंदा:

काष्टी येथील लोकसेवा हॉटेलमध्ये जेवण करत असताना झालेल्या भांडणात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथे घडली आहे.

शिवाजी चोरमले आणि त्याचे मित्र जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा आरोपींनी फिर्यादीचा मित्र सचिन कुटे याच्या आणि सुत्रधार शिंदे यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या कारणावरून भांडण सुरू झाले. भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चोरमले व त्याचे मित्र महेंद्र महारनोर यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके, लोखंडी कोयता, चाकू व टिकावाने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात महेंद्र महारनोर गंभीर जखमी झाले आहेत.

याशिवाय, मित्र विलास रामभाऊ उबाळे यांना डोक्यात मारहाण करून जखमी केले गेले. इतर मित्रांनाही मारहाण करून जखमी केले आहे.

चोरमले यांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी सुत्रधार शिंदे, रा. शिरसगाव काटा, ता. शिरुर, जि. पुणे (पुर्ण नाव माहीत नाही), गणेश दत्तात्रय मचाले, रा. इनामगाव, ता. शिरुर, जि. पुणे, राहुल लहु महारनोर, रा.वागंदरी, ता. श्रीगोंदा व इतर अनोळखी ७ ते ८ इसमांविरुद्ध भा.द.वि कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, १२० (ब) सह आर्म अँक्ट ४/२५  प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई समीर अभंग प्रकरणाचा तपास करीत आरोपींचा शोध घेत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading