दिनांक ६ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
आज रोजी केंद्र सरकारने गॅस व इंधन दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष मिनल ताई भिंताडे यांनी चूल पेटवा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार व मा. आ राहुल दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून श्रीगोंदा तहसीलचे तहसीलदार प्रदीप पवार यांना दिले.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही, केंद्र सरकारने वारंवार गॅस तसेच इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला रोजच महागाईच्या खाईत लोटत आहे. covid-19 मुळे आधीच खूप प्रमाणात नोकऱ्या गेल्या आहेत. तर, कोणाच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोसळलेले असताना केंद्र सरकार रोजच गॅस व इंधनाची दरवाढ करत आहे.
तरी केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हंटले आहे. निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, (नगराध्यक्षा) शुभांगी ताई पोटे, (नगरसेविका सीमाताई गोरे, मनीषाताई शेलार, (पंचायत समिती सदस्य) कल्यानीताई लोखंडे, शोभाताई शिर्के, विद्याताई आनंदकर, निर्मला डफळ, आशाताई शेलार, गीताताई गायकवाड, मृणाली शेलार, मुकुंद सोनटक्के (सामाजिक न्याय विभाग), राष्ट्रवादी (युवकचे तालुकाध्यक्ष) ऋषिकेश गायकवाड, (सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष) संदिप उमाप, (अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष) अजिमभाई जकाते, मोहन भिंताडे, (सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष) राहुल बागे, (सा.न्या.विभागाचे तालुका उपाध्यक्ष) दिपक ससाणे, (सा.न्या.विभागाचे तालुका सचिव) शैलेंद्र सांगळे, (सा.न्या विभागाचे विधानसभा अध्यक्ष) तात्या घोडके, गंगाराम मचे, सुभाष काळे, शिवाजीराजे नंनवरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(संदीप उमाप यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
