अहमदनगर दिनांक २३ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे बुधवारी जिल्हा दौ-यावर येत आहेत. या दौ-यात ते पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील टंचाईसदृश परिस्थितीची पाहणी करणार असून अधिकारी-पदाधिका-यांसमवेत त्या-त्या तालुक्यात आढावा बैठकाही घेणार आहेत. पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी पालकमंत्री प्रा.शिंदे करणार असून राज्य शासनाने टंचाईसदृश तालुक्यात जाहीर केलेल्या उपाययोजना आणि सवलतींच्या अंमलबजावणी संदर्भात संबंधितांना सूचना करणार आहेत.पालकमंत्री प्रा.शिंदे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ६:३० वाजता शासकीय मोटारीने पुणे येथून पारनेरकडे प्रयाण. सकाळी ८:३० वाजता काळकुप ता. पारनेर येथे आगमन व टंचाईसदृश्य भागांची प्रत्यक्ष पहाणी. सकाळी ९ वाजता काळकुप येथून जामगाव ता. पारनेरकडे प्रयाण. सकाळी ९:१५ वाजता जामगाव येथे आगमन व टंचाईसदृश्य भागांची प्रत्यक्ष पहाणी. सकाळी ९:४५ वाजता जामगाव येथून शासकीय मोटारीने तहसील कार्यालय,पारनेरकडे प्रयाण. सकाळी १०:१५ वाजता पंचायत समिती कार्यालय, पारनेर येथे आगमन व टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी ११:१५ वाजता शासकीय मोटारीने सारोळा सोमवंशी ता. श्रीगोंदाकडे प्रयाण. सकाळी ११:४५ वाजता सारोळा सोमवंशी येथे आगमन व टंचाईसदृश्य भागांची प्रत्यक्ष पहाणी. दुपारी १२:१५ वाजता शासकीय मोटारीने घुटेवाडी ता.श्रीगोंदाकडे प्रयाण. दुपारी १२:४५ वाजता घुटेवाडी येथे आगमन व टंचाईसदृश्य भागांची प्रत्यक्ष पहाणी. दुपारी १:३० वाजता पंचायत समिती कार्यालय, श्रीगोंदा येथे आगमन व टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी २:३० वाजता शासकीय विश्रामगृह, श्रीगोंदा येथे राखीव. दुपारी ३:१५ वाजता शासकीय मोटारीने रेहकुरी ता. कर्जतकडे प्रयाण. दुपारी ३:४५ वाजता रेहकुरी येथे आगमन व टंचाईसदृश्य भागांची प्रत्यक्ष पहाणी. दुपारी ४:१५ वाजता शासकीय मोटारीने वालवड ता.कर्जतकडे प्रयाण. सायंकाळी ४:३० वाजता वालवड येथे आगमन व टंचाईसदृश्य भागांची प्रत्यक्ष पहाणी. सायंकाळी ५:१५ वाजता शासकीय मोटारीने पंचायत समिती कार्यालय,कर्जतकडे प्रयाण. सायंकाळी ५:३० वाजता पंचायत समिती कार्यालय कर्जत येथे आगमन व टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ७ वाजता शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. रात्री ८:३० वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
Related News
