पारगाव ,श्रीगोंदा दिनांक १६ ऑक्टोबर :
पारगाव गावाकडून श्रीगोंदा येथे जाताना, एम एच ०६ ए.सी.३३१२ या ट्रक मधून पोकलेन मशीन घेऊन जात असताना, पारगाव एम.एस.सी.बी. सब स्टेशन जवळील चढावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक मधील पोकलेन मशीन रोडवर कोसळले. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, रोड शेजारील अंबादास घोडके यांच्या घराची भिंत तसेच, उभ्या राहिलेल्या अंबादासा घोडके व वडळी येथील सुभाष सर्जेराव शिंदे यांच्या मोटर सायकचे नुकसान झाले आहे. हि घटना आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला कळविले असता, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे व्ही.एम.बडे यांनी येऊन घटनास्थळी पंचनामा केला असून, पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
( छायाचित्रे – योगेश चंदन )


