कुकडी व घोड चे आवर्तन २० ऑक्टोबर रोजी सुटणार – बबनराव पाचपुते

श्रीगोंदा दिनांक १६ ऑक्टोबर :

दि.३/१०/२०१८ रोजी झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत, पाऊस जर पडला तर कुकडी प्रकल्पातून दि.१० नोव्हेंबर पासून आवर्तन देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, या दरम्यानच्या काळात पाऊस जर पडला नाही तर परत बैठक घेऊन दि.१० नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणारे आवर्तन लवकर सोडण्याचा निर्णय दि.३/१० च्या झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला होता . त्यानुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाचपुते दादा जलसंपदा मंत्री ना.गिरीषजी महाजन साहेब यांचे संपर्कात राहून कुकडी व घोड च्या आवर्तना करीता लवकरात लवकर परत बैठक लावावी म्हणून सतत प्रयत्नशील होते. त्यानुसार, आज जलसंपदा मंत्री ना. गिरीषजी महाजन साहेब यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सद्या शेतक-या कडील असलेली पिके व फळबागा जगविण्यासाठी कुकडी व घोड चे आवर्तन दि.२० ते २५ ऑक्टोबर पासून सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली.या सोडण्यात येणा-या आवर्तनामधून लाभक्षेत्रातील पिकांसह बंधा-यातही काही प्रमाणात पाणी सोडण्याचे निश्चित झाले आहे. तसेच, आवर्तना दरम्यान सर्वांनीच पाण्याचा वापर जपून करावा ,असे माजी मंत्री बबनराव (दादा) पाचपुते यांनी सांगितले आहे. सदर बैठकीस जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार दिलीप वळसे पाटील ,आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार सोनवणे, माजी आमदार पोपटराव गावडे तसेच कुकडी चे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ हे उपस्थित होते. 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading