येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य तरुणांच्या हतात -प्रा. डॉ. बाळासाहेब बळे….

लोणी व्यंकनाथ ,श्रीगोंदा दिनांक १६ ऑक्टोबर :                                            ग्रमिण विकास केंद्र जामखेड,लोकअधिकार आंदोलन व कोरो मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातील,श्रीगोंदा तालुक्यातील १० गावांमधील भटके विमुक्तां सोबत महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबवीण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणुन, दहा गावांतील शाळांमध्ये आदिवासी पारधी,भिल्ल व भटके विमुक्तांच्या मुला मुलींचे बालविवाह व शालाबाह्य होण्याचे लक्षणीय प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षकांना सोबत घेऊन, भटके-विमुक्तांच्या शाळेतील मुला मुलींची व त्याच्या पालकांची बैठक दि. १५ अॉक्टोबर २०१८ रोजी लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्यु.कॉलेज येथेे पार पडली.याप्रसंगी प्रा.बळे बोलत होते.यावेळी प्राचार्य एस.एम.गवळी लोकअधिकार आंदोलनाचे जिल्हासचिव प्रमोद काळे,जिल्हा उपाध्यक्ष आसाराम काळे,ए.बी पाचपुते सर, एस.पी.इथापे सर, एस. ए.दळवी सर उपस्थित होते.                                                                                                 प्रा.बळे पुढे म्हणाले की, आदिवासी पारधी ,भिल्ल व भटके-विमुक्तांच्या समस्या फार गुंतागुंतीच्या आहेत. या समाजातील युवक बदलाच्या भुमिकेत असुन, जुन्या व कालबाह्य चालीरीतींना तो कंटाळलेला आहे. त्यामुळे समाज बदलाच्या या प्रक्रीयेला सध्या पोषक वातावरण असुन, युवकांनी यासाठी संघटीत लढा उभारल्यास समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या भेदभाव , जातपंचायत , अंधश्रद्धा, व्यसनाधीता,बालविवाह,अंतर्गत कलह, समाजांतर्गतची अस्पृश्यता हे प्रश्न सुटु शकतील.त्यमुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य तरुणांच्या हतात असल्याचे प्रतिपादन करतानाच, जर त्या द्रुष्टीने प्रयत्न झाले नाहीत, तर येनाऱ्या  काळातील समस्यांची तीव्रता भयंकर असल्याची चिंता यावेळी त्यांनी व्यक्त केली.                                                                                यावेळी प्रास्तविकात आपले मनोगत माडंताना लोकअधिकार आंदोलनाचे जिल्हासचिव प्रमोद काळे म्हणाले की,पालक व विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन, त्यांचे प्रश्न व अडचणी समजुन घेणे व त्यांना शिक्षणाचे महत्व समजावुन सांगणे व नंतर त्यांच्या पालकांसोबत बैठकीचे नियोजन करुन शाळेतच त्यांचे प्रबोधन करणे, पुढे ही मुले शालाबाह्य होऊ नये तसेच, त्यांचे बालविवाह करु नये. यासाठी आपण पाठपुरवा करणार आहेत.सदरील उपक्रमांच्या माध्यमातुन पुढील तीन वर्ष वेगवेगळे क्रुती कार्यक्रम संस्था घेणार असुन, येत्या तीन वर्षात श्रीगोंदा तालुक्यातील कीमान ३०० मुली १०वी पर्यंत व ३०० मुले पदवी पर्यंत शिक्षण घेतील, हे उद्दीष्ठ संस्थेने समोर ठेवले आहे.सध्या ५ वी ते १२ पर्यंतच्या मुलामुलींची यादी तयार करुन त्यांच्याबरोबर फोकस काम करणार आहोत . त्यासाठी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत वस्तीवर बैठका घेऊन चर्चा करुन कौटुंबीक हिंसाचार ,भेदभाव ,जातपंचायत , अंधश्रद्धा,व्यसनाधीता,बालविवाह,स्री ला वस्तु म्हणुन पहाण्याची मानसिकता यासारख्या मुद्यांना घेउन काम करणार आहोत .                         यावेळी लोकअधिकार आंदोलनाचे तालुकाध्यक्ष शरद काळे,विलास काळे,ग्रामपंचायत सदस्या ज्योती भोसले,संतोष भोसले, सुरेश भोसले, जयश्री काळे, छाया भोसले,दिवान भोसले, सागर भोसले, नितीन भोसले,निर्मला भोसले, बेबी काळे, राजु भोसले आदि उपस्थित होते. यावेळी माजी राष्ट्रपति यांच्या स्म्रुतीप्रित्यर्थ वाचक दिनानिमित्त उपस्थितांचा पुस्तक भेट देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

Leave a Reply