श्रीगोंदा दिनांक १६ ऑक्टोबर :
श्रीगोंदा शहरालगत असलेल्या पेडगाव रोडच्या बाजूच्या मोकळ्या शासकीय जागेत, गेल्या चार पाच दशकांपासून वास्तव्यास असणाऱ्या मातंग ,बौद्ध या मागासवर्गीय ,भिल्ल या आदिवासी, आणि धनगर या भटक्या विमुक्त जाती जमाती व मराठा कुटुंबाच्या घरांवर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थिती राहून अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली बेकायदेशीर रित्या काही समाजविघातक लोकांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे, उपेक्षित घटकांच्या वास्तव्यावर घाला घालीत, त्यांना त्यांच्या राहत्या जागेपासून परावृत्त केले आहे.सुमारे १७ घरांची मोड तोड करीत त्यांचे संसार उघडयावर आनण्यास तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकार कारणीभूत झाले आहेत.त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून पीडितांनी दिनांक १५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते.
यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे अजय महाराज बारस्कर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेट देऊन या घटनेचा व घटनेतील दोषींचा निषेध केला .पुढील काळात या पीडितांना न्याय देण्याच्या उद्देशाने संघटना काम करणार असून, याविषयी संपूर्ण माहिती आमदार बच्चू कडू साहेब यांना देण्यात आली आहे. शिवाय ते विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव सुनील ओहोळ यांनीही अतीशय तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध नोंदवला असून ,यातील बेकायदा बांधकामे पडणाऱ्या तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर एट्रोसिटी नुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी या आंदोलनात केली आहे.
बारा बलुतेदार संघटनेचे तालुका अध्यक्ष कांतीलाल कोकाटे यांनी या ठिकाणी घटनेचा निषेध करून नमूद मागण्यांची पूर्तता करण्याविषयी प्रशासनांस सूचित केले आहे.श्रीगोंदयातील आमदार व माजी मंत्री तशेच राजकीय भूमिकेतील व्यक्तीमत्व याठिकाणी या विषयी पीडितांची साधी विचारपुस करण्यासाठी आले नसल्याचे कोकाट यांनी नमूद केले.
दलित महासंघाचे संजय चांदणे व शिवाजी बुलाखे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवीत कारवाईची मागणी करून आंदोलनाला पाठींबा दिला.
अनिल ठवाळ ,मानवी हक्क अभियानचे अशोक मोरे व रामफळे ,लोकाधिकार आंदोलनाचे प्रमोद काळे ,दलित महासंघाचे चंद्रकांत सकट ,बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल म्हस्के ,प्रहार जनशक्ती पक्षाचे नितीन रोही व आबासाहेब पुराणे, कांबळे, पवार व विनोदसिंग राजपूत ,भटके विमुक्त संघटनेचे आप्पा सोनवणे ,नितीन सोनवणे ,बहुजन मुक्ती पार्टीचे युवा अध्यक्ष संजय सावंत ,दीपक घोडके ,अमर घोडके ,विलास रसाळ, नंदुभाऊ ससाणे ,ज्ञानदेव शिरवाळे ,संभाजी ब्रिगेड चे अरविंद कापसे ,दत्ता सावंत ,तांबे,चंद्रकांत काळे यांच्यासह पीडित कुटुंबातील सर्वजण उपस्थिती होते.
यावेळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार ,नायब तहसिलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी दिघे उपस्थित होते.पीडितांच्या मागण्यांचा विचार करता मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटना स्थळाचा पंचनामा अहवाल सादर करण्यासाठी उशीर झाल्याने त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? म्हणून नोटीस देण्यात आली.इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला नसल्याने व वरिष्ठ अधिकारी हे काही महत्वाच्या शासकीय कामात व्यस्त असल्याचे पोलीस निरीक्षक पोवार यांनी आंदोलन कर्त्यांना सांगितले.सोमावरी किंवा मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये उर्वरित मागण्यांच्या संदर्भांत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हे प्रकरण हाताळणारे व पीडित यांच्या सह एट्रोसिटीच्या मागणी संदर्भात सविस्तरपणे चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, विषयी पोलीस निरीक्षक पोवार यांनी सूचित केल्यानंतर आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मागण्यांची पूर्तता न झाल्यास पोलीस उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे पीडितांनी यावेळी नमूद केले आहे.

