तालुक्यातील वंचीत व उपेक्षित समाज घटकांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यान्वित राहणार : वामन भदे…

श्रीगोंदा दिनांक ११ ऑक्टोबर

दिनांक १५ ऑक्टोबर वार सोमवार रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी निवडीची बैठक प्रदेक्ष अध्यक्ष मा. अजय महाराज बारसकर व राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करनार आहेत. यानंतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करुन, श्रीगोंदा तालुक्यात पुर्ण ताकतीने संघटन बांधणी केली जानार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिली आहे. श्रीगोंदा शहरात देखील शहर कार्यकारणी व शाखा बाधंनी केली जानार असल्याचे यात नमूद केले आहे. पुढील काळात प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार संघटना ही तालुक्यातील वंचीत व उपेक्षित समाज घटकांसाठी कार्यान्वित राहणार असून, ८० टक्के समाजकारन व २० टक्के राजकारन या विचाराने पुढील काळात कामं करनार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी पक्षाच्या ध्येय धोरणांबरोबर येनाऱ्या सर्वांना घेऊन कार्य करनार असून, श्रीगोंदा तालुक्याचा संपुर्ण विकास व गोरगरीब जनतेची कामे येवढेच संघटनेचे ब्रिद असनार आहे .हे करत असताना अगदी ग्रामपंचायत, पचांयत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्ष पुर्ण ताकतीने काम करनार आहे. आज पहिल्यांदा आम्ही आमच्यासाठी काम करत असल्याची भावना कार्यकर्त्यां मध्ये निर्माण झाली आहे.कारन मी ओ.बी.सी. तालुका अध्यक्ष पदाचा राजीनाम देऊन, माझ्या बरोबर भाऊ पुराने यांनी देखील शिवसेना शहर अध्यक्ष पदाचा राजीनाम दिला आहे. त्याच बरोबर नितीनभाऊ रोही यांनी देखील आपल्या शिव वाहातुक सेनेचा शहर अध्यक्ष पदाचा राजीनाम दिला आहे. आता आम्ही फक्त पक्षासाठी काम करनार आहोत, असे वामन भदे यांनी नमूद केले आहे. खरतर शिवसेनेचं काही एक कामं पेडगाव गणात नसतान, १८०० मतदान आम्ही घेतले व पहिल्यांदा शिवसेनेचे डिपॉजीत राखले . हे वैशालीताई वामन भदे यांनी करुन दाखवले. पण येथील शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फक्त लॉबीचे राजकारन केले ,असल्याचा आरोप भदे यांनी केला आहे. यामुळेच शिवसेना सोडावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या मानसाला स्वतःची ग्रामपंचात निट चालवता येत नाही. त्या मानसावर पक्ष विश्वास ठेवतो, हिच मोठी शोकांतिका असल्याचेही म्हणणे आहे. या पुढील काळात प्रहार जनशक्ती पक्ष या पार्टीच्या माध्यमातुन भाऊ साहेब पुराने, नितीनभाऊ रोही, कांतीलाल कोकाटे, साहेबराव रासकर, संजय सागळे पाटील व आमचे संपुर्ण पदाधिकारी जनतेसाठी काम करनार असल्याचे वामन भदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील व श्रीगोंदा शहरातील जनतेला या बैठकीत सहभागी होण्याचे आव्हान भदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading