रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान..

श्रीगोंदा दिनांक १२ ऑक्टोबर :

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान..

माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून बहुपयोगी सभागृहाचे भूमिपूजन..

महादजी शिंदे विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने नियोजित सभागृहाचे भूमिपूजन काही पत्रकार, व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते महादजी शिंदे विद्यालयात संपन्न झाले.

यावेळी विद्यालयाच्या अगदी सुरुवातीच्या बॅच मधील विद्यार्थी मा.भाऊसाहेब कापसे, शेख मॅडम,शंकरलाल काला,दिलावर पठाण,निशिकांत दंडनाईक,लतीफभाई जमादार एम.टी.दरेकर,प्रकाशशेठ पटवा यावेळी उपस्थीत होते.

याप्रसंगी माणिकचंद संजयकुमार बोरा यांनी १००००(दहा हजार रू) तर थोर देणगीदार काला भाऊसाहेब यांनी सभागृहाच्या बांधकामासाठी पत्नीच्या स्मरणार्थ १००००० (एक लाख रू.) देणगी जाहिर केली.

घरातून विरोध असुनही केवळ रयत मुळे मी शिकू शकले ,असे प्रतिपादन विद्यालयाची पहिली मुस्लिम विद्यार्थीनी शेख मॅडम यांनी केले.स्वतःच्या संस्था न उभारता रयत मध्ये काम करणारे बाबासाहेब भोस व बबनराव पाचपुते यांचे योगदान मोलाचे आहे .असे मत पत्रकार बाळासाहेब काकडे यांनी व्यक्त केले . बाळासाहेब बळे,भाऊसाहेब कापसे,काला भाऊसाहेब, बाबासाहेब भोस यांनी मनोगत व्यक्त केले.बाबासाहेब भोस यांची समन्वय समिती पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .विद्यार्थ्यांनी रयतचे नाव सातासमुद्रापार न्यावे असा आशावाद कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक प्राचार्य कन्हेरकर सर, सुत्रसंचालन भुजबळ सर, तर आभार पर्यवेक्षक नलगे सर यांनी मानले . यावेळी पत्रकार अमोल गव्हाणे ,पीटर रणसिंग, दत्ता जगताप इत्यादी पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी विद्यार्थी, कार्यकर्ते यांचा विद्यालय व रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading