दिनांक ८ मे २०२४, श्रीगोंदा:
आज आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, चंद्रहार पाटील, निलेश कराळे, राहुल जगताप, घनःश्याम शेलारांसह विविध पुरोगामी, बहुजन, मुस्लिम, मागासवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ आणि त्यांच्या सुविध्य पत्नी पंचायत समिती सदस्या सौ.अनुराधाताई ठवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.
शरद पवार यांच्या सूचनेनुसार निलेश लंके यांच्या विजयासाठी आपण मतदार संघात असून, सर्वसामान्य माणसाला हवासा वाटणारा आणि कोरोनात जीवितहानी होऊ नये यासाठी अथक परिश्रमाने पारनेर स्थित लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड सेंटर स्थापन करत सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा नेता निलेश लंके एकीकडे आणि केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपचे डॉ.सुजय विखे हे खासदार असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्याची साधी तसदी सुद्धा दाखवली नाही. म्हणुन, आम्हाला लोकनेता निलेश लंके यांच्या विषय आस्था निर्माण झाल्याचे मत अनिल ठवाळ यांनी नमुद केले आहे.
आढळगाव कार्यक्षेत्रातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात झालेत. त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला. खासदार असून, विखेंनी महामार्ग अधिकाऱ्यांना साध्या सूचनाहि केल्या नाहीत. सन २०१९ ला निवडून दिल्यानंतर सुजय विखेंनी एकही कामं केलेले नाही. मतदार संघातील लोकांचा, पदाधिकाऱ्यांचा फोन उचलला नाही. विखेंच्या हुकूमशाहीमुळे त्यांना रामराम केला. कार्यकर्त्यांना ताकत दिली नाही. विकास कामं नाहीत. आढळगावचे पाच मानसं अपघाती मृत्यू झाल्यावर साधी चर्चाही केली नाही. BSNL ची जागा आढळगावं ग्रामपंचायतीला देण्यास टाळाटाळ केली. विखेंचा लोकं संपर्क कमी असल्याने आपण विखेंना सोडुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे अनिल ठवाळ यांनी माध्यमांना सांगितले.
निलेश लंके दिड लाख मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास ठवाळ यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला आहे. लंके गरीब आणि सर्वसाधारण उमेदवार असून, कुकडी खालचा आहे. रस्त्याचा, पाण्याचा प्रश्न लंके हाकेच्या अंतरावर असल्याने सोडवू शकतात. कोविड काळात ३३ हजार लोकांना जीवदान देण्याचे काम लंकेनी केले आहे. आणि लोकांचा जीव गेला तरी विखे भेटायला आले नाहीत. अशी प्रतिक्रिया ठवाळ यांनी प्रवेशानंतर दिली आहे.
स्रोत:(अनिल ठवाळ यांची प्रतिक्रिया)
