दिनांक ३ सप्टेंबर(पारगाव सुद्रीक,श्रीगोंदा):
मिळालेल्या माहितीनुसार पारगाव सुद्रीक येथील उपसरपंच राजेंद्र मोटे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. दिनांक २७ ऑगस्ट २० रोजी बारा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार श्रीगोंदा यांच्या समोर दाखल केला होता. तहसीलदारांनी दिनांक ३ सप्टेंबर रोजी मिटींग आयोजित करीत उपसरपंच राजेंद्र मोटे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला आहे.
अविश्वास ठरावाच्या बाजुने ११ मतदान झाले व मोटेंच्या बाजुने २ मतदान झाले. त्यामुळे आकरा विरुद्ध दोन आसा ठराव मंजूर करण्यात आला. तर तीन सदस्य तटस्थ राहिले.
सभापती शहाजी हिरवे, बाळासाहेब जगताप, आबा साहेब रेपाळे, मंगेश घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले व ठराव मंजूर करून आणला.
स्रोत:(मिळालेली माहिती)
