दिनांक ११ मे (आढळगाव,श्रीगोंदा):
आढळगावात मागील १५ दिवसांपासून चालू असलेल्या कोविड केअर सेंटरला सामान्य लोकांकडून विविध प्रकारे मदत केली जात आहे. या कोविड सेंटरला भेट देवून, सामाजिक कार्यकर्ते आतिकभाई कुरेशी यांनी हे सेंटर कसे चालते? पेशंट किती आहेत? त्यांची जेवनाची, राहण्याची सोय कशी आहे? अश्या प्रकारे त्यांची आपुलकीने चौकशी केली. या सेंटर मधील रूग्णांसाठी डॉक्टरचा सल्ला घेऊन मेडिसिन १२ मेडिसीन किट आढळगांव स्थित कोविड सेंटर मध्ये शरद जमदाडे, सुभान तांबोळी व माउली उबाळे यांच्या कडे सुपूर्द केले.

त्या प्रमाणेच श्रीगोंदा कोविड सेंटर मध्येही सदरील औषध किट देण्यात आले आहेत. या रमजान ईदच्या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येक मुस्लिम बांधवांना सदका व जकात देने बंधन कारक आहे. हीच जकात आपन विविध कोविड सेंटरला मेडिसिन, जीवनावश्यक वस्तु, फळे, मास्क, सेनिटाइजर अश्या विविध स्वरूपात आतिकभाई कुरेशी यांनी दिली आहे. आपण गरजूंना दिलेल्या मदतीतुन एखाद्याला जीवनदान मिळू शकते. यापेक्षा आपल्यासाठी मोठा आनंद काय असेल ? असे मत कुरेशी यांनी माध्यमांना सांगितले आहे.
कोरोना संक्रमण काळामध्ये प्रत्येक मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी करून, रमजान ईदची नमाज घरिच पठन करावी. असे बोलत त्यांनी सर्व मुस्लिम समाज बांधव व श्रीगोंदा वाशीयांना रमजान ईदच्या शुभेच्या दिल्या.
यावेळी RPI (A)चे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप, राहुल बागे, शरद जमदाडे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पै.सुभान तांबोळी, पै.माउली उबाले, रघुनाथ शिंदे, पंडित सिदनकर आदि हजर होते.
स्रोत:(आतिक भाई कुरेशी)
