दिनांक १२ मे,श्रीगोंदा:
मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती दिल्याने, आवर्तनाबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता. (दि. ११) मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याने कुकडीच्या आवर्तनचा विषय मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया आमदार बबनराव पाचपुते यांनी माध्यमांना दिली.
या संदर्भात बोलताना श्री. पाचपुते म्हणाले, (जलसंपदा मंत्री) जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आपण स्वतः, (आमदार) रोहित पवार, (आमदार) अतुल बेनके उपस्थित होते. यावेळी असणारी गरज, पाणी नाही मिळाले. तर, शेतकऱ्यांचे कधी ही न भरून येणारे नुकसान आदी बाबी जयंत पाटील यांच्या समोर मांडल्या. कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावेच लागेल, ही स्पष्ट भूमिका घेतली. ज्या याचिकेमुळे हा विषय लांबला त्या याचिकाकर्त्यांना (आमदार) अतुल बेनके यांनी फोन केला. जयंत पाटील स्वतः त्यांच्याशी बोलले.

पिंपळगाव जोगे धरणासाठी २५ कोटींचा निधी वापरून डेडस्टॉकचे पाणी वापरात आणले जाईल. पाण्याचा कायमचाच प्रश्न मार्गी लागेल. हा कुकडी प्रकल्पातील सर्वांचाच मोठा फायदा आहे. आपण सहकार्याची भूमिका घ्यावी, असे याचिककर्त्यांस आस्वस्त केले. त्यामुळे न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. न्यायालयाचा निकाल ही सकारात्मक असेल, कुकडीचे आवर्तन तातडीने सुटून सर्वांना पाणी मिळेल, अशी माहिती पाचपुते यांनी दिली.
डिंभे – माणिकडोह बोगद्याचा निर्णय लवकरच.
डिंभे ते माणिकडोह बोगदा हा कुकडी प्रकल्पासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. हा बोगदा झाला तर एक आवर्तना एवढे वाया जाणारे पाणी सहज उपलब्ध होऊन सर्वांनाच न्याय मिळेल. या बाबत जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात आज चर्चा झाली. अशीच एक बैठक घेऊन तो विषय सर्वांना एकत्र बसून मार्गी लागेल, त्यामुळे कुकडी चा मोठा प्रश्न सुटून पाण्या ची कमतरता कधीच जाणवणार नाही. – बबनराव पाचपुते (आमदार श्रीगोंदा)
The issue of rotation of chickens was resolved: Babanrao Pachpute.. Meeting of MLAs in the benefit sector in Mumbai.. Successful mediation of Jayant Patel..
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
