दिनांक १२ मे,श्रीगोंदा:
पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने आतिक भाई कुरेशी यांनी श्रीगोंदा तालुक्यातील विविध भागात ईदसाठी मिष्ठान्न बनवण्यासाठी लागणारा पदार्थांचे किट बनवून सुमारे एकशे दहा लोकांना दिले आहे.

कालच त्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णानां व गरजू लोकांना औषधांचे कीट, फळे वाटप केले होते. त्याच जाणिवेतून आणि सामाजिक बांधिलकीतुन सामाजिक कार्यकर्ते कुरेशी यांनी ११० लोकांना रमजान ईद निमित्त हे किट वाटप केले आहेत. Atik Bhai Qureshi distributes confectionery kits to 110 people on the occasion of Ramadan Eid.
यावेळी त्यांच्यासोबत पपु नद्दाप, जावेद फकीर, वसिम कुरैशी, महमंदजैद कुरैशी खाजा आरिफ कुरैशी, आसिफ पठाण (घोडेगाव), रफिक नद्दाप सह मित्र परिवार उपस्थित होता.

स्रोत:(आतिक भाई किरेशी)
