ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त व “कॉंग्रेस बळकटीकरण सप्ताह” निमित्ताने “ना. बाळासाहेब थोरात युवा करंडक” वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

दिनांक ४ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त “कॉंग्रेस बळकटीकरण सप्ताह” निमित्ताने अहमदनगर जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेसने “ना.बाळासाहेब थोरात युवा करंडक” वक्तृत्व स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे आयोजित केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष राजूदादा गोरे होते. प्रमुख उपस्थिती (माजी नगराध्यक्ष) मनोहर दादा पोटे, (नगरसेवक) समीर बोरा, प्रशांत गोरे , संतोष कोथिंबीरे आदी उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या वक्तृत्व स्पर्धेत ४० स्पर्धकांनी भाग घेतला, यामध्ये श्रीगोंद्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक– साक्षी संजय परकाळे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय हिने मिळविला. द्वितीय क्रमांक– प्रांजल प्रमोद कुलकर्णी, गुगळे कॉलेज श्रीगोंदा आणि तृतीय क्रमांक– शिवानी रमेश जठार, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांना मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिक हर्षवर्धन वाजे यास मिळाले.

परिक्षण श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे रसाळ सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन नागवडे सर यांनी केले. तर, आभार प्रदर्शन अहमदनगर जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेस सरचिटणीस आदेश शेंडगे पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन दिग्विजय नागवडे (विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस), आदेश शेंडगे पाटील (युवा नेत), वैभव नागवडे (युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष), योगेश मेहेत्रे (विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष) आदिल शेख (शहराध्यक्ष), धिरज खेतमाळीस (विद्यार्थी कॉंग्रेस तालुका कार्याध्यक्ष) अक्षय नितनवरे, अजिंक्य चोरमले आदींनी केले.

स्रोत:(आदेश शेंडगे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading