जलसंपदा विभाग व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला भावपूर्ण श्रद्धांजली व पुष्पहार घालून निषेध करीत, संभाजी ब्रिगेडचे उपोषण मागे..

दिनांक ४ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

कुकडी पाटबंधारे विभाग २ श्रीगोंदा आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अहमदनगर या दोन खात्याने पत्र देऊन, या आंदोलनात तील आपली जबाबदारी सोडली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

इ. जि. मा. १४१ क्रमांक या रोडवर घोड कॅनाॅल वरील पुल पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे याठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यासाठी संभाजी ब्रिगेडने दिनांक ४/२/२१ रोजी घोड कॅनॉल जवळ पुला शेजारी अमरण उपोषण केले.

उपोषण स्थळी घोड शाखेचे शाखा अधिकारी प्रभुणे यांनी येऊन पत्र दिले व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकाऱ्यांनी व्हाट्सऍपद्वारे पत्र दिले. पत्रात दोन्ही अधिकाऱ्यांनी नमूद आहे की, पुलाचे काम आमच्याकडे हे येत नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा पाचपुते तसेच, जिल्ह्याचे खासदार सुजय दादा विखे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी यांना लवकरच भेटणार आहोत.

या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, महेंद्रजी शेंडगे, लखन शिंदे, मुकुंद सोनटक्के, संभाजी ब्रिगेडचे मयूर आढाव, सुदामजी खामकर, पत्रकार प्रकाशजी मस्के, अशोक नवले, गोरख वाळून, विश्वंभर नवले, बाळासाहेब खामकर, कैलास नवले, ॲड. अशोकराव वाळुंज तसेच टाकळी व भिंगाण गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणस्थळी श्रीगोंदा पोलीस स्टेशने चोख बंदोबस्त ठेवला होता.

स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा यांचे प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading