दिनांक २२ मे, श्रीगोंदा:
श्रीगोंद्याचे (शहरातील गणपति मळा) भूमिपुत्र (पोलीस उप निरीक्षक) प्रेमकुमार लहू दांडेकर (विशेष अभियान पथक प्रमुख गडचिरोली) यांनी दिनांक २१ मे २०२१ रोजी उपविभाग एटापल्ली अंतर्गत पोमके कोटमी हद्दीतील मौजे – पैडी (गडचिरोली) जंगल परिसरात नक्षलवादी दबुन असल्याची गोपनीय माहितीदारामार्फत माहिती कळताच दांडेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक प्रभारी म्हणून, तयार केले. त्या पथकातील जवानांना योग्य मार्गदर्शन करून तत्काळ पथकासह रवाना करीत कारवाई केली. या गौरवनिय कामगिरीनंतर त्यांचे वरिष्ठांसह ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

सविस्तर असे की, पैडी जंगल परिसरात अभियान राबवित असतांना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलीस पथकावर अंदा – धुंद गोळीबारं होत असतानां, त्यांना दांडेकर यांनी प्रत्यूतर केले. समय सूचकता व बुद्धि कौशल्याचा वापर करत, स्वताच्या जीवाची पर्वा न करता, जोरदार व नियंतत्रीत गोळीबार करून, पोलीस पथकावर भ्याड हल्ला करण्याऱ्या नक्षलवाद्यांचा डाव दांडेकर यांनी उधळून लावला.
कोणत्याही अप्रिय घटनेशिवाय १३ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश प्राप्त केले. यामध्ये १ डीव्हिसीएम, १ पी.पी.सी.एम., ४ एसी.एम. व अन्य मोठ्या प्रमाणात नक्षली सहित्य हस्तगत करण्यात पथकाला यश मिळून दिल्याने, ही निश्चितच प्रशंसनीय व कौतुकास्पद बाब असून, पोलीस दलाची प्रतिमा उंचावनारी आहे. असे गौरउद्गार वरीष्ठ अधिकाऱ्यांनी काढले आहेत. once – again- po- u – n – premkumar dandekars – appreciation – from-superintendent -of-police-ankit-goyal
त्यामुळे दांडेकर यांना अंकित गोयल (पोलीस अधीक्षक गडचिरोली) यांनी गौरवाचे पत्र देत, शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर श्रीगोंदा बाजार समितिचे (सचिव) दिलीप डेबरे, (प्रहारचे) पदाधिकारी नितीन रोही, (माजी नगरसेवक) दादासाहेब औटी, अंबादास औटी, (संभाजी बिग्रेडचे) अरविंद कापसे, सुदाम दांडेकर, (रेल्वे पोलीस) किरण दांडेकर आदिंनी प्रेमकुमार दांडेकर यांना नमूद कामगिरीबद्दल शुभेच्छा देत कौतुक केले आहे.
स्रोत:(नितीन रोही)
