दिनांक १३ मार्च,श्रीगोंदा/कान्हूरपठार,ता. पारनेर:
श्रीगोंदा तालुक्यातुन द्राक्ष भरून चाललेल्या टेम्पोला कान्हूर पठार येथे अपघात झाला. या अपघातांमध्ये एक जणाचा मृत्यू झाला असून,चौघे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कानूर पठार, तालुका पारनेर येथे बुधवारी (दि.१०) सायंकाळी ६.३० वाजता भरधाव टेम्पोने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. चौघे जखमी झाले. त्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन एका कारला फरपटत बसस्थानकात नेले. राहुल शिवराम पवार (वय १७, रा. वडगाव दर्या, ता. पारनेर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

यामध्ये सुनील शिवराम घुले (वय ३५, रा. पिंंपळगाव रोठा, हे गंभीर जखमी झाले. प्रकाश शिंदे (वय १४), गणेश रोकडे (वय २०, दोघे रा. वडगाव सावताळ) व रंजना पवार (वय ३३, रा. वाघुंडे) हे किरकोळ जखमी झाले. अपघातग्रस्तांना युवकांनी तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
स्रोत:(गुगल)
