दिनांक २९ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
विशाल बाळासाहेब बोथरे वय ३० वर्ष व नवनाथ बाळू शिदे वय ३२ वर्षे दोघे राहणार आढळगांव ता. श्रीगोंदा यांनी हिरा गुटखा व रॉयल ७१७ सुगंधीत तंबाखू ही मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतीबंध असलेला पदार्थ जो मानवी जिवीतास अपायकारक आहे.हे माहीत असताना त्याची विक्री करण्याचे उदेशाने विनापरवाना बे कायदा आपल्या कब्जात बाळगून काल दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०० चे सुमारास श्रीगोंदयातील गणपती मळा येथे इंडिका गाडीतून वाहून नेताना पोलिसांना मिळुन आले.

यानंतर श्रीगोंदा पोस्टे. तील पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नमूद दोघांवर गु. रजि. न. २००८/२०२० भादंविक ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे पोकॉ विकास वैराळ यांनी गुन्हा दाखल केला असून, पोहेकॉ आर.बी.झुंजार पुढील तपास करीत आहेत.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा)
(नमूद इमेज प्रतिकात्मक वापरण्यात आली आहे)
