दिनांक २८ नोव्हेंबर(पिसोरे खांड,श्रीगोंदा):
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सिध्दार्थ तरुण मंडळ, पिसोरे खांड यांच्या वतीने संविधान प्रास्ताविक वाचन व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, संविधान प्रबोधनाचा कार्यक्रम पिसोरेखांड येथे साजरा करण्यात आला.

येथे २६ नोव्हेंबर हा संविधान दिन संविधानाची प्रास्ताविका सह घटनेतील मूल्य नमूद करीत, सर्वसामान्यांसाठी घटनात्मक महत्त्व विशद करून साजरा करण्यात आला. अजिंक्य ओहोळ (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी अजिंक्य ओहोळ, हर्षल ओहोळ, रवि गाडे, सुदर्शन ओहोळ, विशाल ओहोळ, प्रमोद ओहोळ, अमोल गोरे, यश ओहोळ, बंडू गावडे, अक्षय ओहोळ, योगेश गाडे, अनिकेत ओहोळ, गणेश गोरे, अमोल गावडे, मंगेश गोरे, तुषार ओहोळ, उमेश इंगळे, भाऊसाहेब गोरे, स्वप्नील ओहोळ सह येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(अजिंक्य ओहोळ यांनी प्रसिध्दीस दिलेली माहिती)
