कळा, उत्तम बंडू तुपे.
रानवडी रानातला जुंधळा बळ धरून उठत हुता . मुंधळ्याची धाटं चांगली चार – पाच पानं धरून मनाजोगी थिर झाली हुती. ह्या वक्ताला वाट्यानं खोत्या घिटल्या की वाटा बरा मिळतो. रानवडी पिकं एक – दोन वक्ताला भांगलून झाली की काय घोर नसतो . पाऊसबी चांगला पडत हुता. एक – दोन वावरांची खोती कुठं मिळती का म्हणून फिरत हुतो. सगळ्यात शेतकऱ्यांचं ध्यान आता मळ्यात गुतलेलं. रानवडी रानं पेरायची ते थेट काढणीला जायाचं . रानवडी रानांच्या उसाभरी करायला त्यासनी येळ हुता कुठं ?

खोती मिळवाय काय नड – आडचण नव्हती . तावासारखी दोन वावरांची खोती मिळाली . शेताचं मालकबी मोकळ्या मनानं बोललं . त्यासनी दानं करून दियाचं ; आपला वाटा आपून उचलायचा . काय घावतेली चार पोती जुंधळ्यांची . कसंबी पाच – सात महिनं बघायला नगं . कुठं ठरलं पोरीच्या लग्नाचं ; तर हे मुंधळं विकून रुपयं उभं करायलाबी घावणार हुतं . वाट्यानं आलेला कडबाबी विकता येणार हुता . बरं आपून काय नुसतं खोती करत बसणार हाय ? हे बघता बघता रोजगारबी करायला येणार हुता . वक्ताला हुरडा , पवा खावून दिवस रेटता येणार हुतं . एका वक्ताच्या भाकऱ्या वाचवता येणार हुत्या . शेतमालक काय बघत बसत न्हाय . जुंधळा निघूसतवर आपूनच शेताचं मालक . खोतीची दोन्हीबी वावरं जवळ ; मधी नुसता बांध हुता . राखणीचं काम एकावर टाकलं तरी घरची दोन माणसं रोजगाराला मोकळी . खोतीच्या नादानं घरीच हुतो . दोन दिवस दहीवडीचा लक्ष्मण पोतराज गावातनं फिरून जात हुता . जाता – येता बघावं तर नारायण चव्हाण पोतराजाला घेवून मळ्यातनं फिरत हुता . केरबाच्या वावरातनं नजर टाकली तर नारायणाच्या मळ्यातलं सगळं दिसत हुतं . खोतीच्या रानात काम नव्हतं म्हणताना केरबाच्या पळाटीवर पावडर फवारत हुतो . पळाटीची बोंडं फुटायला लागली हुती . फवारा मारायचं टाकून बघत हुतो . नारायण पोतराजाला घेवून पिपळाच्या खालच्या रानात उभा हुता .
तिथं गुपित धन हाय आसं बोललेलं ऐकलं हुतं . ते गुपित धन जेठा लेक , डोढी सुण मागतंय . त्याच्यावर दांडगा भुजंग राखण करतो . हेबी ऐकलं हुतं . म्हणत्यात पायाळूला धन आन् पाणी दिसतं . मला दिसलं न्हाय कवा . पावडरची फवारणी करता करता बघत हुतो – कंबरच्या जोळीतनं भंडारा – अंगारा उधळून पोतराज काय करत हुता . तिसऱ्या दिवसी सकाळचं केरबाच्या रानात कामाच्या वढीनं निघालो हुतो . खोती घिटलेल्या रानातलं मुंधळं आजून राखणीला आलं नव्हतं . म्हणताना लोची आन् मंगलबी केरबाच्यात भांगलाय आल्या हुत्या . पाटाची कड धरून चाललो हुतो . तवर नारायण चव्हाण आडवा झाला . ” संत्या ! तुला काय सांगिटलं हुतं ? आरं , चार – चार दिवस हिथं – तिथं रोजगार करत फिरण्यापेक्षा माझ्यात का येत न्हाय ? त्या दिसी द्राक्षाची बाग कापायची आर्धी सोडून गेला . धर , तंबाखू खा . “ नगं , आताच खाल्लीय . ” ” बरं , सांजचं ये मळ्याकडं . ‘ ” का ? काय काम हाय काय ? ” ” व्हय . काम वाईच नडीचं हाय . ‘ “ केरबाचं काय काम नसलं तर इन . ” तुझ्या बारा नडी बाजूला ठेव . सांजचं ये . ” ” इतकं वळीचं काय काम हाय ? ” नारायणसंगट बोलत हुतो ; तवर वस्तीवर बांधलेलं बकर आरडलं . त्याच्या मागनं दुसरंबी आरडलं . ” मालक ! बकरीबी पाळायचा बेत हाय वाटतं . “
‘ आयला तुझ्या ; तुला लई फाणगाडं फोडाय लागत्यात . नारायण गोडीला आला हुता . ” ” ” ” कवा न्हाय ते ” 7 ” ” ” संतू ! हे काम तुझ्याबगार हुणार न्हाय . नारायणासंगट बोलत हुतो ; तवर मंगल आन् लोची केरबाच्या रानात पोच झाल्या हुत्या . तिथनं हाका मारायचा धडाका लावलेला . ” मालक ! जातू आता . टाईम झालाय . ” जा ; मी काय तुला धरून ठिवला न्हाय . पर सांजचं ये . न्हाय म्हणू नगस . ” बघतो . मंग सांगतो . पर काम काय हाय ते तरी सांगा . ‘ ” ते त्या वक्ताला सांगीन . आता सांगायसारखं न्हाय . ‘ आता तुमचं काम हाय ; न्हाय कसं म्हणायचं ? येतो मी . ” नारायण कपाळात बसला हुता ; तरी येतो म्हणून सांगितलं . गुत्यातनं सोडवून घिटल्यागत कामाकडं सुटलो . जाग्यावर गेल्या गेल्या लोचीनं तोंड उघडलं “ काय वं म्हणत हुता रक्ताडा ? ” “ सांजचं काय काम हाय म्हणत हुता . “ जाऊ नगसा . धनाचं मारांगण करायचं हाय . ” तुला कसं गं कळलं ? ” “ येताना कोंडी भेटली . सगळी पोरं घेवून माहेराला गेलीय . तवा ती सांगत हुती . ‘ “ आसूदी कायबी . जसं काम ; तसं दाम घियाचं . ” ” काय आग लावायची का त्या दामाला ? जिवाचा घात झाला मंजी ? पैका का उरावर बांधून नियाचा का ? ” ” काय व्हत न्हाय . आपलाबी देव काय कमी न्हाय . आग्या येताळ म्हणत्यात त्याला ; सगळ्या भुतांचा राजा ! वर्षा कोंबड्याची जत्रा काय फुकट करतो काय ? त्याच्यावर भरोसा ठिवायचा . ” ” ते तर झालं वं ; त्याच्यावर तर जीव जगवतोय . ” दिवसभर केरबाच्यात रोजगार केला . भुतागत कामं रेटली नि सांजची सुटी झाली तवा नारायणच्या मळ्यात गेलो .
नारायण माझीच वाट बघत हुता . त्याच्या बाजूला लक्ष्मण पोतराज बसला हुता . वीस – पंचीस लिंब त्याच्या पुढ्यात हुती . बांधलेली पाच बकरी . दोन कोंबडं पोतराजाकडं बघून डोळं मोठं करत हुती . टकरला आल्यागत तुंबून उभी राहिलेली बकरी . आला व्हय संतू ; बरं झालं . ‘ ‘ आलू की ; काय करायचं ? ” ” ” “ हे बघ . दहीवडीच्या शिवला कवड्यांचं माळ हाय . तिथं वारुळावर हिंगणाचं झाड हाय ; तेवढं तोडून आण . “ छा , छा . आपल्याला ते हुणार न्हाय . कच्याबच्यांची पाटी हाय माझी मालक . ” ” ” ” आरं , नुसतं झाड तोडून आणायचं ; तसंच येताना पांढरी रुईबी आणायची ; रुईचं झाड बामनाच्या मळ्याच्या बांधावर हाय बघ . मुळासकट खांदून आणायची . ” “ मालक ! ती रुईबी वारुळावर हाय . ” आसुदे ; काय व्हतं न्हाय . ” “ रुई खांदताना अंगावर करगुटा दिकून ठिवायचा न्हाय . ” पोतराज बोलला . अंगाला घाम सुटला . ह्या मारांगणाच्या वस्तू आणताना काय काय विघ्नं येत्यांत हे ऐकूण ठावं हुतं . ‘ ” मालक ! मंग आसं करा ; ह्या पोतराजाला हे आणाय सांगा . मीबी माणूस हाय . उदया काय कमी – सरस झालं तर माझ्या घराला वणवा लागंल . ” ” काय व्हत न्हाय . “ तसं काय झालं तर मालक मागच्या माणसाला कायबी कमी पडू देणार न्हाय . ” पोतराज पुन्हा बोलला .
“ संतू ! रुपयं दोनशे देतो या कामाचं . ‘ दोनशे रुपय ! जीव भुलल्यागत झाला . घटकंचं काम ; दोनशे रुपयं मिळणार ! “ मालक ! वाईच घरी जावून येतो ; कु – हाड आणाय पायजी . ” ” ही नव्हं का हाय टिकाव – कुन्हाड . ‘ “ न्हाय . माझी कु – हाड चांगली हाय . आत्ता येतो . ‘ एका दमात घर गाठलं . जपून ठेवलेली फरशी – कु – हाड काढली . देवापुढचा मूठभर गुलाल घेऊन बाहेर आलो . येताळाच्या मार्गाला तोंड करून गुलाल उधळला . “ देवा , येताळ बाबा ! ह्या वक्ताला पाठणीवर उभा रहा . जत्रा करीन . ‘ दिवस बुडायला मळ्यात आलो . “ मालक ! रुपयं आदी हातांत दया . ” इश्वास न्हाय व्हय संतू ? ” “ तसं नव्ह ; यव्हार चोख आसलेला बरा . ” मालकानं दोनशे रुपयं हातावर ठिवलं . कु – हाड – टिकाव घेवून वारं झालो…
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
