दिनांक २३ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिका हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी,सर्व खाजगी वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांचे वाहतूकीस साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतूदीनुसार श्रीगोंदा शहर व ग्रामीण भागात दूचाकी तसेच चारचाकी वाहनामध्ये पेट्रोल / डिझेल भरुन अनावश्यक – रित्या नागरिक फिरतांना दिसून येत आहेत.
तरी सदरच्या गर्दीस आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून,केवळ जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या डिझेल वाहनांना पहाटे ५:०० ते सकाळी ९:०० वाजता डिझेल पुरविणेत यावे.अशी सूचना स्थानिक प्रशासना मार्फत देण्यात आली आहे.
पेट्रोलचा पुरवठा सर्व वाहनांना पुर्णपणे बंद करण्यात यावा.असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या वाहनांना सदरचा आदेश लागु होणार नाही:
१. सर्व शासकीय सेवांशी निगडीत वाहने,
२. रुग्णवाहिका,आनीशामक वाहने,वैदयकीय उपचारासाठी लागणारे वाहने,
३. सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये , पोलीस विभाग , सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना यांचे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने ( ओळखपत्राशिवाय डिझेल देवू नये ),
४. आजारी व्यक्ती तसेच रुग्णालय,पॅथलॉजी लॅबॉरेटरी,दवाखाने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची वाहने (ओळखपत्र पुराव्याशिवाय डिझेल देवू नये ),
५. प्रसार माध्यमांचे ( सर्व प्रकारची दैनिक / नियतकालिके / टिव्ही न्युज चॅनेल इ.) यांचे कर्मचारी व प्रतिनिधी यांची वाहने (ओळखपत्र पुराव्याशिवाय डिझेल देवू नये),
६. दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या आस्थपनांकडील वाहने तसेच त्यांचे अधिकारी / कर्मचारी यांची वाहने,
७. फळे व भाजीपाला विक्री करणारे वाहने.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांस भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) च्या कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील,असेही तहसीलदार माळी यांनी नमूद केले आहे.
नमूद आदेश दिनांक २३ / ०३ / २०२० रोजी रात्री ७ :०० वाजेपासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहील.अशी माहिती श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
