दिनांक २२ जुलै, काष्टी/श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा. ना. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात, इलाईट फार्मा अकॅडेमी, पुणे सोबत केलेल्या सामंजस्य करार अंतर्गत ‘ ‘बेसिक्स ऑफ फार्माकोव्हिजिलन्स अँड मेडिकल कोडींग’ या विषयावर अर्चना गावडे, डायरेक्टर, इलाईट फार्मा अकॅडेमी, पुणे यांनी ऑनलाईन व्याख्यान दिले.
यात विद्यार्थ्यांसाठी फार्माकोव्हिजिलन्स व मेडिकल कोडींग मध्ये असलेल्या विविध संधी बद्दल माहिती दिली. कंपनीशी केलेल्या सामंजस्य करार (MOU) अंतर्गत परिक्रमा फार्मसी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नियमित गेस्ट लेक्टर आयोजित केले जातात व विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी प्रयत्न केले जातात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली. प्रा. सचिन अनभुले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी परिक्रमा संस्था सतत प्रयनशील असते व असे कार्यक्रम अधिकाधिक आयोजित करू अशी माहिती संस्थेचे संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.
ह्या स्तुत्य उपक्रमाचे, अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, संकुल संचालक डॉ. विजय पाटील व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल पुंड यांनी अभिनंदन केले.
स्रोत:(परिक्रमा शैक्षणिक संकुल कडून प्रसिद्धीस दिलेली माहिती)
