पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन..

दिनांक ८ जानेवारी, श्रीगोंदा:

पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस रेझिंग डे (पोलीस स्थापना दिवस) दिनांक २ जानेवारी २१ ते ८ जानेवारी २१ या कालावधीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन मार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

दिनांक २ जानेवारी रोजी सायं ५:०० वा. त्रिदल अकॅडमी श्रीगोंदा येथे पोलीसांची कामाची पद्धत, मुलींच्या सुरक्षितता बाबत मार्गदर्शन केले तसेच, पोलीस स्टेशनला असलेल्या हत्याराबाबत माहीती देण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी सायं ६:३० वा. आदिवासी वस्ती मडकेवाडी, लोणी व्यंकनाथ येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून, आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने मुलांना शालेय साहित्य वाटप केले. मुलांना गुन्हे दाखल झाल्यानंतर होणारे परिणाम याबाबत माहिती दिली. शिवश्री विठ्ठलराव कापसे वाचनालय येथे दिनांक ३ जानेवारी रोजी सायं. ७:३० वा. मुलांना पोलिसांची कामाची पद्धत, मुलींच्या सुरक्षितता वाहतुक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दिनांक ५ जानेवारी रोजी दु. २ ते ३ वाजनेच्या दरम्यान श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथील विद्यार्थांना पोलीस स्टेशनच्या कामकाज, महिला सुरक्षा विषय, वाहतुक नियम, चारित्र्य पडाळणी, सोशल मीडियाचा वापर तसेच कोरोना अनुषंगाने घेण्यात येणारी काळजी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनला असलेल्या हत्याराबाबत माहीती दिली.

६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन, श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पत्रकारांशी सुसंवाद साधण्यात आला. पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. शिवाजीराव नागवडे इंग्लिश मिडीयम स्कुल श्रीगोंदा येथे आयोजीत कार्यक्रमात सदरवेळी सायबर क्राईम, वाहतुक नियमन, महिला सुरक्षा, कोरोनाचे अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

दि. ८ जानेवारी रोजी श्रीगोंदा शहरात बस स्टॅण्ड, शनिचौक, बगाडे कॉर्नर, झेंडा चौक आशा वेगवेगळ्या ठिकाणी थांबून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाश्वभूमीवर पोलीस गाडीवरील पी ए सेट द्वारे अलौन्समेंट करून मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्स पाळणे बाबत जनजागृती करण्यात आली.

सध्या कोव्हीडचा प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टंन्सींगचे पालन करुन विद्यार्थांना मोठ्या प्रमाणावर एकत्रीत न जमावता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

स्रोत:(श्रीगोंदा पोलिसांची प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading