धम्मपरिषद
पहिली धमपरिषद तथागत गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर राजगृहामध्ये भरली ती सात महिने चालली त्यानंतर १०० वर्षांनी आणि ११८ वर्षांनी अशोकाच्या काळात तिसरी धम्मपरिषद भरली होती हे भांडण मिटावे म्हणून भिक्खू संघाने एकत्र येऊन काम करावे यासाठी अमात्यांना पाठवण्यात आले. अमात्यांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला . पण काही उपयोग होत नव्हता.

राजाचा हुकूमही मानत नाहीत हे पाहून अमात्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी न ऐकणाऱ्या भिक्खूचा शिरच्छेद करायला सुरूवात केली. अनेक भिक्खू मारले गेले. तेव्हा अशोकाचे बंधू तिष्य त्याच्यापुढे झाले आणि म्हणाले , “ त्यांना मारण्याअगोदर मला ठार करा. ‘ तेव्हा अमात्य तिष्याकडे पाहून शांत झाले . तिष्य सम्राटाचा भाऊ . त्यांना मारणे शक्य झाले नाही . अमात्य गोंधळून गेला . त्याच्यापुढे त्यांनी हार खाल्ली आणि बौद्ध भिक्खूचे प्राण वाचले . या सर्व गोष्टी पाहून तिष्य हिमालयात निघून गेला. याचे त्याला खूप दुःख झाले . या सर्व घटनांची माहिती अशोकाला कळाली . अशोकाला फार दुःख झाले . त्यात भिक्खूची हत्या याचा तर धक्काच बसला.
त्यानंतर अशोक स्वतः त्या विहारात गेला . अशोकांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना म्हणाले , ” तुमच्यामध्ये असा सामर्थ्यवान भिक्खू कोणी नाही का ही दुही नष्ट करून धम्मकार्यासाठी संघटन करेल, आपसातील दुही संपुष्टात आणेल ? ” भिक्खू संघातील भिक्खू एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा भिक्खूनी एकमुखाने मोग्घलीपुत्र तिष्य याचे नाव सूचित केले . अशोकाला संघाच्या एकमुखी निर्णयाचा आनंद वाटला . त्यावेळी अहोगंग पर्वतातून मोग्घलीपुत्र तिष्य यांना मोठ्या सन्मानाने बोलावून घेतले. तिष्य गंगाघाटाजवळ येताच अशोकाने स्वतः पाण्यात उतरून तिष्य यांना नौकेतून उतरवून घेतले . तेव्हा मोग्घलीपुत्र तिष्य विहारात न जाता रतिवर्धन बामेत उत्तरला .
एक आठवड्यानंतर अशोकांनी त्याच्याशी विचारविनिमय केला आणि त्यानंतर अशोकविहारात एक विशाल सभा आयोजित करण्यात आली . त्या सभेत भक्खूना एक प्रश्न विचारण्यात आला . ” भगवान बुद्धाचे विचार तत्त्व कोणते ? ” प्रत्येकाचे उत्तर वेगळंच . मूळ तत्त्वाशी विसंगत होतं . अशा भिक्खूचे चिवर उतरवून त्यांना पांढरे कपडे परिधान करण्यास लावून साठ हजार पाखंडी लोकांना हाकलून लावले . मात्र जे बौद्ध धम्माच्या विचारांशी व तत्त्वांशी एकनिष्ठ होते, त्यांना विभाष्यवादावर प्रश्न विचारले . ‘ बौद्ध धम्माचा अनेक अंगाने विचार केला तरी तो एक असतो ‘ अशी उत्तरे मिळाली .
त्या भिक्खूना दोषमुक्त करून अशोक आपल्या महालात परतला . यात मोग्घलीपुत्र तिष्याने एक हजार बौद्ध भिक्खूची निवड केली . ही सभा संगीती (धम्मपरिषद) मोग्घलीपुत्र तिष्य यांच्या अध्यक्षतेखाली व अशोकाच्या देखरेखीखाली इ.स.पूर्व २५३ मध्ये पार पडली . तेव्हा धम्मग्रंथ लिखित नव्हते. अनेक भिक्खूना ते पाठ होते किंवा आठवत होते . ते शुद्ध स्वरूपात लिहिण्यास सुरुवात केली.
जवळ जवळ १००० भिक्खू अशोकारामविहारात ९ महिने अविश्रांतपणे लिखाण करत होते . पहिली संगीती गौतम बुद्धांच्या काळात दुसरी गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर चार महिन्याने व त्यानंतर अशोकाच्या काळात म्हणजे गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर १०० वर्षांनी. भिक्खूच्या वेशातील पाखंडी यांच्या वर्तनामुळे उपोसथ किंवा पवारण समारंभात खंड पडला गेला. तत्त्वनिष्ठ आणि पाखंडी यांच्यातील वाद फारच विकोपाला गेला होता. यावेळी मोग्घलीपुत्र तिष्य याने २३ भागात ‘ कथावत्यू ‘ नावाचा ग्रंथ लिहिला . हा बौद्ध धम्मावरील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो .
हे तिसऱ्या धम्म परिषदेचे एक क्रांतिकारी पाऊल होते. त्यानंतर धम्मज्ञानाने तयार झालेल्या लोकांना अशोकांनी अनेक देशात धम्मप्रसारासाठी पाठवले. १) मज्झांतिक स्थविर काश्मीर आणि गांधार २) महादेव स्थाविर महिल मंडळमध्ये. ३) दक्षिण स्थविर वनयासमध्ये ४) यवन धम्म स्थिविर अपरोतमध्ये ( कोकण ) ५) महारक्षित स्थिविर हिमवंत प्रदेशामध्ये (हिमालय) ६) महाधम्म रक्षित महाराष्ट्रामध्ये ७) महिंद्र आणि सहकारी सवळ भद्रसास श्रीलंकेमध्ये ८) सोन उतर सोवन भूमी पेगु…
क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातून)
