छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य प्रत्यक्ष अनुभवलेली भूमी म्हणजे पेडगाव. भीमा नदी आणि देव नदीच्या संगमावर वसलेलं हे गाव. पुरातन काळात दक्षिणेकडील व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेले ५२ पेठा या गावात होत्या. चालुक्य शैलीतील लक्ष्मिनारायण मंदिर, चित्र मंदिर, भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, बालेश्वर मंदिर. आजही पेडगावच्या पौराणिक, ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात . सद्यस्थितीत गावची लोकसख्या पाच हजार असून ऊस बागायतदार पट्टा म्हणून ओळखले जाते. याच गावातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळामधून गुणवंताची खाण बनली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पेडगाव. गावाच्या मध्यवर्ती वसलेल्या या शाळेत १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १९३३ साली झाली. सुरवातीला वाड्यात शाळा भरायची. दगडी बांधकामाची पत्र्याची इमारत. सभोवतालचा परिसर भीमानदीच्या पाण्याने बागायती बनल्याने पावसाळ्यात इमारतीखालून पाणी वाहू लागले . इमारत धोकादायक झाली . गांभीर्य लक्षात घेऊन शालेय व्यवस्थापन समितीने ग्रामस्थांना बरोबर घेतले . शासनाकडे पाठपुरावा करून जुन्या इमारतीचे निर्लेखन करण्यास मंजुरी आणली . ग्रामस्थांनी त्याच जागेवर सर्वशिक्षा अभियानांतर्गत ९ खोल्यांचे भव्य ज्ञानमंदिर दिमाखात उभे केले .
शाळा सिद्धी मुल्यमापनानुसार शाळेने ‘ अ ‘ दर्जा प्राप्त केला आहे. पालक, ग्रामस्थ माजी विद्यार्थी, आजी – माजी पदाधिकारी यांच्या सहकार्याने सर्वागीण विकास घडवला. शाळेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. यासाठी शालेय स्तरावर अनेक शालेय व सहशालेय उपक्रम राबविले जातात. लोकसहभागातून शालेय अध्यापनासाठी संगणक, प्रोजेक्टरची खरेदी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या सहकार्याने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचे दैनंदिन अध्यापन केले जाते. यु ट्यूबच्या सहाय्याने अध्ययन केले जाते .
अप्रगत विद्याथ्यार्साठी वाचनकार्ड, स्वाध्याय कार्ड, स्वाध्याय पुस्तिका, गणित पेटीचा वापर दैनंदिन अध्यापनात केला जातो. १४ व्या वित्त आयोगांतर्गत प्रत्येक वर्गास एलईडी स्क्रीन देण्यात आले आहेत . शाळेचे १०० विद्यार्थ्यांचे लेझीम पथक असून ढोल, ताशावादन स्वत : विद्यार्थी करतात. लेझीम पथकाने हिरडगाव, शेडगाव, श्रीगोंदा, आनंदवाडी या ठिकाणी आनंदमेळाव्याचे नेतृत्व केले आहे. लेझीम पथक तयार करताना सुरवातीच्या काळात मेहनत घ्यावी लागली . परंतु आता विद्यार्थी स्वयंअध्ययनाने इतर विद्यार्थ्यांची कृती पाहून अनुकरणाने लेझीम शिकतात, ढोलवादन शिकतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, संघभावना वाढीस लागली आहे. शाळेच्या अभिमानाची बाब म्हणजे भव्य लालमातीचे क्रीडांगण. पूर्वी शालेय परिसरामध्ये ३ फुट पाणी साचत असे. ग्रामपंचायतीतर्फे या ठिकाणी प्रथम भर टाकण्यात आली. लोकसहभागातून खो – खो , कबड्डी क्रीडांगणासाठी २० ब्रास लालमाती मागविण्यात आली. शाळेला कायमस्वरूपी क्रीडांगण मिळाल्याने विद्यार्थ्यांना मैदानी खेळ शिकवले जातात .सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी सांस्कृतिक मंच नव्हता. भैरवनाथ यात्रा कमिटीच्या सहकार्याने शालेय इमारतीच्या निलेर्खानामध्ये निघालेल्या दगडापासून भव्य असा क्रीडामंच उभारण्यात आला. या मंचावर दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी, व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी सोनू – मोनू बँक स्थापन करण्यात आली असून विद्यार्थ्यांना पासबुक देण्यात आले आहे. पासबुकचे लेखन स्वत: विद्यार्थी करतात. विद्यार्थ्यांचे शालेय दप्तर कमी करण्यासाठी वर्गनिहाय कपाटे बनविण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. शालेय परिसर प्लास्टिकमुक्त असून विद्याथ्यार्मार्फत गावामध्ये स्वच्छता फेरी काढून जनजागृती केली जाते. पुरातत्व विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या किल्ला स्वच्छता अभियानामध्ये विद्यार्थी वेळोवेळी सहभागी होतात. कचरा व्यवस्थापनासाठी ओला कचरा, सुका कचरा स्वतंत्र गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. शालेय परिसरात वृक्षलागवड केलेली असून त्यांचे संवर्धन केले जाते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा परिपाठात वाढदिवस साजरा केला जातो. शाळेचे सुसज्ज ग्रंथालाय आहे. क्षेत्रभेटीचे आयोज, शैक्षणीक सहल आयोजन केले जाते.
मुख्याध्यापक सुनीता काळे, सहशिक्षक मंगल औटी, प्रमोद शिर्के, परशुराम आरु, विजया निगडे, दिपाली शिंदे, मीनाक्षी शेळके, जयश्री खेडकर हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबाजान तांडेल, उपाध्यक्ष संदीप पवार आहेत. केंद्रप्रमुख दिलीप घोडके, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे, नीलकंठ बोरुडे, गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. मा. अध्यक्ष विद्या नवले, संजय गोसावी, बापू कणसे, पंचायत समिती उपसभापती प्रतिभा झिटे, मा. उपसभापती हरिदास शिर्के, माजी पंचायत सदस्य हेमंत ओगले, चेअरमन नानाभाऊ झिटे, सरपंच भगवान कणसे, उपसरपंच देविदास शिर्के, मा. सरपंच चंदा पवार, सविता घोडके, हसनभाई शेख, मा. विद्यार्थी पी.एस.आय. सुनील कदम, नितीन घोडके, गोपाळराव जाखडे या सवार्चे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
शब्दांकन : राजू शेख, प्रतिनिधी, साप्ताहिक आवाज.. मुस्ताक पठाण, समाचार प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचा व शाळेच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शाळेच्या विकासामध्ये ग्रामस्थांचे भरीव असे योगदान आहे. सुनिता काळे, मुख्याध्यापक.
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन झालेल्या वेळेची आहे.)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
