दिनांक २२ एप्रिल २०२४,कोळगाव:
तालुक्यातील ढोरजे येथे महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गुरु – शिष्य जयंती संयुक्तरीत्या फुले- शाहू- आंबेडकर विचार मंच व गावातील ग्रामस्थ, महिला यांच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर रणसिंग हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रशांत चव्हाण यांनी, शाहू, फुले, आंबेडकर यांनी पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. समाजातील अज्ञान, अंधकार, रूढी व परंपरा यांना छेद देऊन, बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचे बळ दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी तर, शिक्षण घेऊन पुढील पिढ्या सूसंस्कृत करा हा मंत्र महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिला.. असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी दीक्षा आढाव, इशा हिवाळे, नाना रणसिंग, अमोल रणसिंग, विशाल बनसोडे, सुरज घोडके, सतीश ओव्हाळ, अमोल कोहक यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमास संपत, राजू, मधुकर, दिवाकर, किसन रणसिंग, दयानंद पारधे, दादू गरुड, प्रकाश भोईटे, भाऊ भालेराव, नाना कांबळे, आदित्य गरुड तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव रणसिंग यांनी तर, आभार प्रदर्शन विनोद उजागरे यांनी केले.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे सर)
