गुटख्यावर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई..

दिनांक ११ डिसेंबर, श्रीगोंदा:

तालुका कार्यक्षेत्रात नशीले पदार्थ, तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्री माध्यमांतून काही इसम आपले अनधिकृत उद्योग वाढवण्याच्या तजवीजमध्ये आहेत. मात्र, श्रीगोंदा पोलीस यंत्रणा यावर कटाक्ष नजर ठेवून असून, काल दिनांक १० डिसेंबर रोजी श्रीगोंदा फॅक्टरी येथे अनधिकृत गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आलेली आहे. विक्रीसाठी चालवलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी स्विफ्ट कारसह त्या इसमास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी तेजस ढमे हा विनापरवाना बेकायदा हिरा पान मसाला, विमल पान मसाला, तंबाखु जे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले नशाकारक तंबाखु व पान मसाला, हा त्याचे ताब्यातील निळया रंगाचे सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार नं एम एच १२ ईटी २१३६ मध्ये हे पदार्थ मानवी आरोग्यास हानीकारक आहे. Police action on Gutkha at Shrigonda factory .. याची जाणीव असतानाही विक्री करण्याचे ऊद्देशाने वाहतुक करत व स्वत: जवळ बाळगतांना मिळुन आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सचिन मस्के यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन, आरोपी तेजस दादासाहेब ढमे वय वर्ष २० याच्याविरुद्ध भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलम ५९, २६(२) (iv) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

स्त्रोत: (फिर्याद)

Leave a Reply