दिनांक ११ डिसेंबर, श्रीगोंदा:
श्रीगोंदा कार्यक्षेत्रातील पत्रकार हे पत्रकार भवन व पत्रकार वसाहत नसल्याने दुर्लक्षित व वंचित राहिलेले आहेत. समाजाचा आरसा व सर्वसमावेशक असणाऱ्या पत्रकारांना हक्काचे कार्यालय किंवा पत्रकार भवन नाही. तालुका कार्यक्षेत्रातून येणारे पत्रकार बांधव हे प्रशासकीय कार्यालयांमध्ये वार्तांकनासाठी आल्यानंतर निर्धारित ठिकाणी बसू शकतील अशी व्यवस्था नाही. तालुक्यातील पत्रकारांची गैरसोय लक्षात घेत, पत्रकार भवनासाठी पुढाकार घेऊन, पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे केशवभाऊ मगर यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यात विविध वृत्तपत्रांचे बहुतांश पत्रकार कार्यरत आहेत. त्यांच्या लेखणीतून सर्वसामान्य समाज घटकातील वंचित/उपेक्षित बांधवांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योगासह विविध क्षेत्रातील वेगवेगळे विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार अहोरात्र करत असतात. मात्र, संसाधन व हक्काचे ठिकाण नसल्याने अडचणी निर्माण होतात.

अशाच अडचनींपैकी एक पत्रकारांना स्वतःचे पत्रकार भवन असणे गरजेचे आहे. परंतु, ते नसल्याने पत्रकारांची गैरसोय होत आहे. वार्तांकनासाठी आलेले पत्रकार चहाचे दुकान, हॉटेल किंवा मिळेल त्या ठिकाणी बसून, आपले दैनंदिन कामकाज करतात. या होणाऱ्या गैरसोयीला लक्षात घेत, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे (माजी व्हाईस चेअरमन) केशवभाऊ मगर यांनी पत्रकार भवनाबाबत पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित करून, पत्रकार भवन बांधण्याबाबत अग्रणी असून, पाठपुरावा करणार आहे. असे आश्वस्त केले.
या पत्रकार परिषदेसाठी जिजा बापू शिंदे, वैभव दादा पाचपुते, जामदार, जितु शेठ मगर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Neglected journalist who presents the plight of the neglected in Shrigonda to the world ..! Patrakar will follow up for Bhavan himself. – Keshavbhau Magar ..
यावेळी (श्रीगोंदा प्रेस क्लबचे अध्यक्ष) विशाल चव्हाण, (उपाध्यक्ष) विजय उंडे, (मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष) अंकुश शिंदे, अमीन भाई शेख, (जिल्हाध्यक्ष) दत्ता पाचपुते, मिराताई शिंदे, गणेश कविटकर, शकील भाई शेख, राजू शेख, मुस्ताक पठाण, समीरण नागवडे, आप्पा चव्हाण, योगेश चंदन, पीटर रणसिंग, प्रमोद आहेर, चंदन घोडके सह पत्रकार उपस्थित होते.
यावेळी प्रेस क्लब श्रीगोंदाचे (तालुकाध्यक्ष) विशाल चव्हाण यांनी बोलतांना सांगितले की, तालुक्यातील पत्रकारांच्या आपुलकीचा विषय केशवभाऊ मगर व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी हाताळत, पत्रकार भवनाबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्याने, तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने केशवभाऊ मगर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत आभार मानले.
स्त्रोत :(पत्रकार परिषद)
