फरार ३ आरोपी श्रीगोंदयातुन जेरबंद.. घरफोडी करून होते नऊ महिने पशार..!

दिनांक ११ डिसेंबर, श्रीगोंदा:

कर्जत तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिका सह आणखी एका ठिकाणी ११ मार्च २१ रोजी घरफोडी झाली होती. या प्रकरणी कर्जत पो.स्टे मध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 3 accused absconding arrested from Shrigonda .. burglary was absconding for nine months ..!

याघटनेबाबत गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी तपास करून, साधारण नऊ महिन्यांपूर्वी घडलेल्या या घरफोडीला उघडकीस आणत, श्रीगोंद्यातुन त्या तिघांना जेरबंद केले आहे.

विशाल नारायण दळवी, (वय ३१ वर्ष, धंदा व्यापार रा.शहाजी नगर, कर्जत ता. कर्जत जि.अ.नगर) यांच्या घरी व आणखी एकाच्या घरी अज्ञात आरोपींनी ११ मार्च २१ रोजी रात्रीच्या वेळी घरफोडी केली होती. सदर बाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यामधील आरोपी विकी विश्वास काळे (वय २३ वर्ष रा. सांगळे वस्ती, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), नंदया पायथ्या पवार (वय २० वर्ष रा.साळवनदेवी रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या दोघांना २० मार्च २१ रोजी अटक केले होते व यातील तिसरा आरोपी प्रदिप ज्ञानदेव भोसले (वय २० वर्ष रा.साळवनदेवी रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) हा फरार होता.

मिळालेल्या माहितीद्वारे त्यांना श्रीगोंदा येथून कर्जत पोलिसांनी अटक करून, मा. न्यायालयासमोर हजर केले. तर, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

सदरील कारवाई (पोलीस अधिक्षक सो अहमदनगर) मनोज पाटील, (अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल, (उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग) आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे (पोलीस निरीक्षक) चंद्रशेखर यादव, (सहाय्यक पोलीस निरीक्षक) सतीश गावित, (पोलीस अंमलदार) अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, सलीम शेख, गोवर्धन कदम, यांनी केली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading