अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; श्रीगोंद्यासह जिल्ह्यात ८ ठिकाणी धाडी, ९ आरोपी ताब्यात.!

दिनांक २५ जानेवारी २०२६,अहिल्यानगर:

दिनांक २३ जानेवारी रोजी जिल्ह्याभरात एकूण ८ ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ३ लाख ८४ हजार ५०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर शहर, कोपरगाव, राहुरी आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

अवैध गावठी हातभट्टी दारू आणि बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा साठा जप्त करण्यात आला आहे.

https://amzn.to/45ylBY6

पोलिसांनी विविध ठिकाणांहून खालील व्यक्तींना ताब्यात घेतले आहे:

  • श्रीरामपूर: लुकमान पठाण, सलमान पठाण, सुरक्षा जाधव, मथुराबाई गायकवाड.
  • कोपरगाव: नितीन शिंगाणे, अलका दांडेकर.
  • राहुरी: अंकुश ढाकणे, भाऊराव पवार.
  • श्रीगोंदा: दादासाहेब डोके…

पोलिसांनी श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी आणि श्रीगोंदा या चारही पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या मोहिमेत उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, दीपक मेढे यांच्यासह मोठ्या पोलीस फौजफाट्याचा समावेश होता.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading