शहरात जुगार अड्यावर छापा..१० जणांवर गुन्हे दाखल..

दिनांक १० सप्टेंबर,श्रीगोंदा:

शहरातील एका हॉटेलमध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी अचानक छापा टाकून, तेथील १० जुगाऱ्यांसह मुद्देमाल जप्त करित त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम नंबर १०८ मध्ये काही इसम तिरट नावाचा हारजितीचा खेळ खेळत असल्याची माहिती गुप्त माहितीदाराकडून मिळताच पोलिसांनी पथक तयार करून, काल दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ च्या सुमारास अचानक छापा टाकला. येथे काहिजन पत्ते खेळत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहून खेळाडू गडबडून गेले. त्यातील एकाने तर दरवाजा ढकलून जिन्यातून थेट उडी टाकून पळ काढला. तर, इतर जुगाऱ्यानां पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

या कारवाईत श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर, वडाळी रोड, दत्तवाडी, साळवनदेवी रोड, मखरेवाडी, मराठी शाळेजवळ, श्रीगोंदा, आढळगाव येथील इसमांचा समावेश आहे.

त्यांच्याकडून ३७,१९० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून जुगार प्रतिबंध अधिनियम १२ अ व अधिनियम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टेबल रोहिदास झुंजार करीत आहेत.

स्रोत:(राजेंद्र राऊत यांच्याकडून मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading