सद्गुरु कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बाबूर्डीतील शेतकऱ्यांना दिले शेतीविषयक उपक्रमांचे धडे.

दिनांक १० सप्टेंबर(श्रीगोंदा/नगर):

शेतीतील नवनवीन आधुनिक पद्धती आणि विविध उपाय अनेक शेतकऱ्यांना अवगत नसतात. तर काहीवेळा चुकीची खते,जंतुनाशके दिल्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. मात्र भविष्यात अशा प्रकारचे नुकसान शेतकऱ्यांचे होऊ नये, यासाठी रा.बाबुर्डी ता.श्रीगोंदा येथील कृषिदूत सुदर्शन ज्ञानदेव गायकवाड या विद्यार्थ्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगांवच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षण, मुरघास प्रक्रिया, बीज प्रक्रिया, किसान अँप, चारा निर्मिती प्रक्रिया, एकात्मिक किड व रोगव्यवस्थापनाच्या विविध पद्धती, शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी, आधुनिक शेतीचे प्रकार, सेंद्रिय शेती, जोडव्यवसाय, गांडूळखत निर्मिती याबद्दल मार्गदर्शन करून त्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न सद्गुरु कृषी महाविद्यालय,मिरजगांव येथील कृषीदूत सुदर्शन ज्ञानदेव गायकवाड याने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२० च्या दौऱ्यात श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी येथे शेतात जाऊन तेथील शेतकऱ्यांना शेतीविषयक उपक्रमांचे धडे देऊन, आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचे संशोधन केले.

या उपक्रमात शेतकरी भिमराव गायकवाड, नारायण बोरुडे,सर्जेराव शिर्के सर व काही महिला शेतकरी या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी शेतकऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. सुदर्शन गायकवाड यांना या उपक्रमासाठी सदगुरु कृषी महाविद्यालय मिरजगांव चे प्राचार्य डॉ. बीटे सर, उपप्राचार्य गोरे सर, तसेच सर्व प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन मिळाले.

स्रोत:(विजय मांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply