पतसंस्था कलेक्शन आणि शेतीत मन ..

पतसंस्था कलेक्शन आणि शेतीत मन ..

कोकणगाव शिवारात १५ एकर खडकाळ माळरान होते . या माळरानावर गवत सोडून पिक येणे अवघड अशा परिस्थितीत खुलेश्वर सहकारी पतसंस्थेचे कलेक्शन करणारे सुरेश महादेव शेंडगे यांनी या कमीशन मधून मिळालेल्या पैशातून माळरान शेतीची डेव्हलपमेंट केली. शेंडगे परिवाराच्या कठोर परिश्रमातून लिंबोणी आणि डाळिंब शेतीचा माळरानावर सुंगध दरवळला आहे.

सुरेश शेंडगे यांचे वडील वारकरी संप्रदाय क्षेत्रात सक्रिय त्यामुळे शेतीची मदार भिमराव संपत व सुरेश यांच्यावर पण भांडवलाची टंचाई अशा परिस्थितीत सुरेश यांनी पतसंस्थेचे कलेक्शन करण्यासाठी सुरू केले या मधून सुरेश यांची बाजारपेठेत मोठी पत निर्माण झाली भिमराव , संपत व त्यांच्या बायका सुनिता व अनिता यांनी शेतीत कष्टाची परिक्रमा सुरू केली सुरेश यांची पत्नी संगीता हीने त्यांना साथ केली सुरेश यांना स्विटी व सुचिता या दोन मुली त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत .

सुरेश यांच्या नियोजनातून डाळिंब लिंबोणी व भुसार पिकांचे नियोजन केले . पाण्याचे नियोजन करण्यासाठी दोन कोटी लिटरचे शेततळे केले आहे . माळरान फळ बागा व कपाशी सारख्या पिकांनी बहरून गेले आहे . या माळरानावर सोने पिकू लागले . लक्ष्मी पिकांच्या रुपाने नांदू लागली आहे .

सुरेश यांनी शेतीतून मिळालेल्या नफ्यातून आणखी साडेसात एकर जमीन खरेदी केली त्यामुळे शेंडगे परिवाराचा उत्साह अधिक वाढला आहे . ज्या शेंडगे परिवाराची बैलगाडी खरेदी करण्याची ऐपत नव्हती त्या शेंडगे परिवाराने शेतीसाठी व फिरण्यासाठी लागणारी वाहने खरेदी केली आणि श्रीगोंद्यात एक बंगला बांधला आहे .

सुरेश शेंडगे यांनी शेतकऱ्यांना सहज पध्दतीने कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी बापुसाहेब जामदार सहकारी सोसायटी स्थापन केली आणि शेतकऱ्यांना सुमारे दोन कोटीचा कर्ज पुरवठा केला आहे . त्यामुळे कोकणगांव परिसरातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळू लागला आहे.

सोसायटीने दिलेल्या कर्जातून शेतकऱ्यांनी शेततळे, तसेच विकासाची इतर कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे कोकणगांव परिसरातील शेतीचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. यामध्ये सुरेश शेंडगे व त्यांच्या सहकार्याचा मोलाचा वाटा आहे.

सुरेश शेंडगे यांची खुलेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक व्यापारी व शेतकरी यांची ओळख झाली. आणि या ओळखीच्या व विश्वासाच्या बळावर मी माझ्या शेतीला दिशा देवू शकलो. आमचे वडील हे आधात्मीक क्षेत्रात काम करत असल्याने त्यांचाही आशीर्वाद आम्हांला लाख मोलाचा ठरत आहे. भविष्यात आपल्या शेती बरोबर इतरांची शेती सुधारण्यासाठी अधिक लक्ष देणार आहे .

संदेश

मी सन २००२ पासून खुलेश्वर सहकारी पतसंस्थेचे कलेक्शन करीत आहे. पण शेती फुलविण्याची फार मोठी जिद्द होती. दोन भावांनी मोठी साथ केली त्यामुळे मनोकामना पुर्ण झाल्या. बंगला गाड्या घेणे शक्य झाले . खरी तर शेती ही शान आहे जगण्याचा अभिमान आहे म्हणून समाजात मान आहे .
सुरेश शेंडगे कोकणगाव

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply