दिनांक १० सप्टेंबर(काष्टी/श्रीगोंदा):
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. ज्ञानेश्वर (नाना) राऊत यांच्याप्रती श्रध्दांजली म्हणून, सामाजिक भावनेने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रोटेक्टीव्ह अप्रोनचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. कल्याण धुमाळ यांनी सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क वापरा, सँनिटायझरचा वापर करून काळजी घ्यावी असे आव्हान केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतिषराव जगताप सर (प्राचार्य जनता विद्यालय काष्टी), मदनशेठ गडदे (अध्यक्ष ओबीसी महासंघ श्रीगोंदा तालुका), मिठूशेठ दांगट (सामाजिक कार्यकर्ते), पै.अजय रंधवे (युवक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर जिल्हा), डॉ. वैशाली चौधरी, आरोग्य कर्मचारी ज्ञानदेव जेवणे, विलास निंबाळकर, सागर कांबळे, मंगल जगताप, अमिना खान, भाऊसाहेब राऊत, कुसूम चव्हाण, आदी कर्मचारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्स ठेवत, मास्क व सँनिटायझरचा वापर करून, कार्यक्रम करण्यात आला.
स्रोत:(पै.अजय रंधवे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
