कोरोना आपत्तीमुळे मुदत संपलेल्या श्रीगोंद्यातील ५८ ग्राम पंचायतींवर प्रशासक..

दिनांक १० सप्टेंबर,श्रीगोंदा:

दिनांक २५ जून २० अन्वये नैसर्गिक आपत्ती, आणिबाणी, युध्द, वित्तीय आणिबानी, प्रशासकीय अडचणी, महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानूसार पंचायतींच्या निवडणूका होणे शक्य नसल्यास, राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतींचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. यानुसार श्रीगोंद्यातील ५८ मुुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आपत्तीचे सावट असल्याने, प्रशासक नेमण्याची सूचना जिल्हा परिषद अहमदनगर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नमूद आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासन स्तरावरिल अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने नमूद आदेशान्वये गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना प्रदान करण्यात आले आहेत. सदर अधिकाराचा वापर करुन, गट विकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांनी नमुद केलेल्या व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून या आदेशान्वये श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे ५८ ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून, या ठिकाणी स्थानिक प्रशासनामार्फत प्रशासक नेमण्यात आले आहेत.

येळपणे, बेलवंडी कोठार, बोरी, अजनूज, आर्वी, अनगरे, आढळगाव, उक्कडगाव, उखलगाव, एरंडोली, कामठी, कोथुळ, कोंडेगव्हाण, कोसेगव्हाण, कोरेगाव, कोरेगव्हान, खांडगाव, गार, घुगल वडगाव, घोडेगाव, घोटवी, चांडगाव, चांबुर्डी, चिखलठाणवाडी, चिंभळा, चोराचीवाडी, टाकळी कडेवळीत, ढवळगाव, ढोरजा, निंबवी, निमगाव खलू, पिंपरी कोलंदर, पिसोरेखांड, बाबुर्डी, गांगर्डा, भानगाव, म्हसे, म्हातार पिंपरी, मुंगुसगाव, यवती, राजापूर, रायगव्हाण, रुईखेल, लिंपणगाव, वडाळी, वांगदरी, वेळू, शिरसगाव बोडखा, शेडगाव, सांगवी दुमाला, सारोळा सोमवंशी, सुरेगाव, हंगेवाडी, हिरडगाव, हिंगणी दुमाला, गव्हाणेवाडी, कौठा, देऊळगाव गलांडे, चिखली इत्यादी ग्रामपंचायतींचा कालावधी संपला असल्याचे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी पंचायत समिती श्रीगोंदा यांना आदेश दिले आहेत.

नमूद आदेशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केले आहे की, दिनांक २५ जून २० अव्यये नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, प्रशासकीय अडचणी, महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी घेणे शक्य झाले नसेल. तर, राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नेमणूक करणे संदर्भात तरतूद असलेने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

स्रोत:(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडील आदेश)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading