श्रीगोंदा पोलिसांचे दोन जुगार अड्ड्यांवर छापे; १२ आरोपी ताब्यात, साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त..

श्रीगोंदा, दि. १ सप्टेंबर २०२५:

श्रीगोंदा पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायावर मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून १२ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील दोन ठिकाणी अवैध जुगार खेळ सुरू असल्याचे कळले. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने छापे टाकून आरोपींना रंगेहात पकडले.

कारवाईदरम्यान एकूण ₹३४,१५०/- रोख रक्कम, ११ मोबाईल अंदाजे ₹२,०४,०००/-, सहा दुचाकी अंदाजे ₹३,३५,०००/- तसेच एक चारचाकी अंदाजे ₹४,५०,०००/- किंमतीसह एकूण ₹१०,२३,१५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाईत पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. श्रीगोंदा पोलिसांच्या या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे व पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..

Leave a Reply