श्रीगोंद्यात चालत्या बसमधून अचानक धूर; प्रवाशांची धावपळ, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप.. video समाविष्ट..

श्रीगोंदा, दि. १ सप्टेंबर २०२५:

श्रीगोंदा शहरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ नगरवरून श्रीगोंदा दिशेने येणाऱ्या प्रवासी बसमध्ये आज दुपारी १२:१५ च्या दरम्यान अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळाचा व्हिडिओ..

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांची मोठी धावपळ उडाली, तर शेजारील परिसरातील नागरिकांनाही घबराटीचा सामना करावा लागला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, बस नायरा पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारी थांबलेली असताना इंजिन विभागातून अचानक धूर निघू लागला. त्यामुळे बसमधील प्रवासी तत्काळ खाली उतरवण्यात आले. यावेळी आसपासच्या नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदत केली. धूर पाहून प्रवासी आणि पेट्रोल पंप परिसरातील लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत अधिक माहिती देताना श्रीगोंदा आगार व्यवस्थापक संदीप ढवळे यांनी सांगितले की, “सदर बसच्या स्टार्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडला असून कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.”

स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणि चालकाच्या सावधानतेमुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यात आली. बसची तपासणी सुरू असून, अशा घटना टाळण्यासाठी तांत्रिक पातळीवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, असेही आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading