दिनांक १० ऑक्टोबर, श्रीगोंदा:
दिनांक ९ ऑक्टोबर रोजी दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांनां अटक करण्यात कोतवाली पोलिसांनां यश आले आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या माळीवाडा बस स्थानक परिसरात पांढऱ्या रंगाच्या इंडिका गाडीमध्ये काही लोकं दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीपूर्वक माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी त्या संशयित गाडीचा पाठलाग करून, नमूद आरोपींनां साधनासह ज्यात एक तलवार, लाकडी दांडके, लोखंडी कटावणी, गावठी पिस्तुल इत्यादी मुद्देमाल त्याब्यात घेऊन पाच जणांना अटक केली आहे.
नमूद प्रकरणात प्रविण गंगावणे (वय २५ वर्ष रा. गुरवपिंप्री ता. कर्जत जि. नगर), मुकेश सावंत (वय ३४ वर्ष रा.सांगवी आष्टी ता.आष्टी जि.बीड), सुनिल थापा (वय ५७ वर्ष मुळ रा.भांडुप, मुंबई हल्ली रा. घोगरगाव ता. श्रीगोंदा जि. नगर), सुनिल खरमाटे (वय ३५ वर्ष रा. पिंपळगाव टप्पा ता. पाथर्डी जि. नगर), शंकर शिरसाठ (वय २२ वर्ष रा. पिंपळगाव टप्पा ता.पाथर्डी जि. नगर) यां आरोपींचा समावेश आहे. Police succeed in nabbing accused in preparation for robbery .. One of the accused is from Shrigonda ..!
या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) संपत शिंदे, (पो.उप.निरीशक) मनोज कचरे, भिंगारदिवे, नितीन शिदे, दिपक रोहकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, शरद गायकवाड, भारत इंगळे यांचा समावेश आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
