श्रीगोंदा.. नवी नवरी दोन दिवसांतच सोन्या, चांदीचे दागिने व रक्कम घेऊन पळाली.!

दिनांक १२ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

पेडगावची रहिवासी असलेल्या नव्या नवरीने दोन दिवसांतच सासरच्या घरातील दागदागीने, रुपये, साड्या, कपडे घेवून पलायन केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निगुडघर गावी घडली आहे. या घटनेमुळे नवरी मुलीने लग्नाच्या नावाखाली सासरच्या लोकांना फसवून रक्कम, सोन्या, चांदीचे दागिने, साड्या व इतर मौल्यवान वस्तू घेवून, जाण्याचा हा प्रकार या भागात चर्चेत आला आहे. या प्रकरणी नवरी मुलीसह मध्यस्ती करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखला केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवरदेवाचे वडील कैलास लिंभारे (वय ६५ वर्षे, रा. निगडुघर, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, निगुडघर येथील कैलास लिंभारे यांना कापडगाव (ता.फलटण, जि. सातारा) येथे पुर्नवसनातून मिळालेल्या जमिनीत येणे – जाणे असते. त्यांच्या या जमिनी शेजारी असलेल्या बाबू जाधवला मुलगा दिगंबर याला लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार जाधव याने सुरेश बुधावले (रा. दहीगाव, ता. माळशिरस, जि.सोलापूर) याच्याशी ओळख करून दिली.

सुरेश बुधावले याने राजू अवघडे व बापजी चव्हाण यांच्या मदतीने श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील संबंधितांची एक मुलगी लग्नाची असल्याचे सांगितले व १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. मुलाचे लग्न जमणार या हेतूने लिंभारे यांनी पैसे देण्यासाठी सहमती दर्शवली. पेडगाव लांब असल्यामुळे लग्नाच्या तयारीने जाऊन विवाह आटपून परतू, असे सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण यांनी लिंभारे यांना सांगितले.

१ ऑक्टोंबरला निगुडघर येथून नवरा मुलगा दिगंबर लिंभारे याच्यासह ९ जण चार चाकी गाडीने सायंकाळी साडेपाच वाजता पेडगावला आले. नवरा दिगंबर लिंभारे, वडील कैलास लिंभारे, सिंधूबाई लिंभारे, मालन शेडगे, राजेंद्र साळेकर यांच्यासह लग्न जमवणारे बाबू जाधव, सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण आदींचा समावेश होता.

विवाहाला येताना दौंडमधून मुलीला २२ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने व श्रीगोंदा शहरातून ३ हजाराच्या साड्या घेतल्या. तसेच, बापजी चव्हाण व राजू अवघडे यांनी कैलास लिंभारे यांच्याकडून ६० हजार रुपये घेतले. पेडगाव येथे लग्न झाल्यावर सायंकाळी साडेसात वाजता नवरी मुलगी सासरच्या लोकांसमवेत रात्रीत निगुडघर येथे आली.

दिनांक ३ ऑक्टोबर रविवारी रोजी कैलास लिंभोरे हे कापडगावला गेले. तेंव्हा घरात नवरा मुलगा दिगंबर, त्याची आई अलका, नवविवाहिता होते. दिनांक ४ ऑक्टोबर सोमवार रोजी पहाटे पाच वाजता नवीन नवरी घरातील सोन्या, चांदीचे दागिने, साड्या व ५ हजार रुपये घेऊन पळून गेल्याचे निदर्शनास आले. Shrigonda .. The new bride ran away in two days with gold, silver jewelery and money!

या घटनेनंतर कैलास लिंभोरे यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नवरी मुलीसह बाबू जाधव, सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भोरचे पोलिस उप निरीक्षक बळीराम सांगळे पुढील तपास करीत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading