श्रीगोंदा..शासनाचे आदेश पायदळी तुडवल्याने तहसिल कार्यालयासमोर BSP चे आमरण उपोषण..!

दिनांक १३ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील Sc, St, Vjnt व दुर्बल घटक असलेल्या भुमीहिन कुटुंबांची अतिक्रमणे नियमाकुल करत, आदिवासी कसत असलेल्या जमीनीं नावावर करण्यासाठी बसपाने आंदोलन करण्याचे ठरवले आहे. बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २१ रोजी सकाळी १०:३०० पासून श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसीलदार व स्थानिक प्रशासनास निवेदन सादर केलेले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, मागील चार वर्षांपासून अनुसूचित जाती / जमाती, भटके विमुक्त व दुर्बल घटक भूमिहीन आहेत. ज्यांना स्वतःची जागा नाही व अतिक्रमणे करून ग्रामपंचायत, महसूल व वन विभागाच्या जागेवर राहत आहेत, अशा अतिक्रमित कुटुंबांची अतिक्रमणे नियमाकुल करून, त्यांना त्या जागेचा खाते उतारा देणेबाबत गेली चार वर्षापासून सतत पाठपुरावा करून देखील केवळ सरकारी अधिकारी व पदाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबांचे अतिक्रमनं नियमित झालेली नाहीत. असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी नमूद केले आहे की, भूमिहीन आदिवासी समाजातील काही लोकांनी मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणे करून उदरनिर्वाहासाठी सरकारी पडीत जमिनी व शेती कसत आहेत. अशा आदिवासी बांधवांना त्या जमिनींची चौकशी होऊन, खाते उतारे बनणे आवश्यक आहेत. परंतु, शासनाचे आदेश पायदळी तुडवत महसूल अधिकाऱ्यांच्या अनास्था व हलगर्जीपणामुळे हे कामं होत नाहीत. तसेच, गावांतील राजकीय पुढाऱ्यांचा या समाजाबाबत असणाऱ्या जातीयवादी मानसिकतेमुळे त्यांना विरोध केला जातो.

सरकारी आदेश असतांनाही केवळ गरीब कुटुंबाबाबत असलेल्या खराब मानसिकता, जातीवादी वृत्ती व उदासीनतेमुळे ही कामं होऊ शकलेली नाहीत. पंचायत समितीकडे तालुक्यातील अतिक्रमण केलेल्या कुटुंबाची यादी असून, अतिक्रमनं नियमानुकूल होऊ शकलेली नाहीत. हा सर्व उपेक्षित वर्ग देशाचा मुळ रहिवाशी असून, मागील शेकडो वर्षांपासून अन्याय सहन करत आहे. Shrigonda.. No work due to negligence of administrative officers ..!

अशा दुर्लक्षित व वंचित राहिल्या लोकांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या कसत असलेल्या जागा नावावर करून, अतिक्रमनं नियमित करावीत. अन्यथा.! बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २१ पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर या दुर्लक्षित समाज बांधवांना सोबत घेऊन, आमरण उपोषण करण्यात येणार असून, याबाबत पीडितांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालवण्यात येईल. अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ यांनी माध्यमांना दिली आहे.

तहसीलदार मिलिंद कुलथे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन सादर करतांना सुनिल ओहोळ (जिल्हा प्रभारी बसपा), कचरु लष्करे (कोषाध्यक्ष, श्रीगोंदा विधानसभा), मोहन काळे (सचिव, श्रीगोंदा विधानसभा), स्वप्निल पवार (संघटक, श्रीगोंदा विधानसभा), विठ्ठल म्हस्के (श्रीगोंदा विधानसभा, अध्यक्ष), नितीन जावळे (शहराध्यक्ष, बसपा), अंबादास घोडके (विधानसभा सचिव, पारगाव सुद्रिक), भाग्यश्री काळे, सीमा भोसले, पार्वती शेलार, सगडया काळे, सुकली चव्हाण, अंबादास रामफळे, दीपक काळे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्त्रोत: (निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading