दिनांक ७ सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदयाच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगी पोटे व त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून, त्यानंतर भाजप उमेदवाराचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. तसेच, राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच, पुन्हा काँग्रेसचे काम सुरू केल्याने, पोटे दाम्पत्यानां अपात्र ठरविण्यात यावे. अशी मागणी (संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष) टिळक भोस, (माजी उपनगराध्यक्ष) अख्तर शेख, (राष्ट्रवादी कॉंग्रेसचे) ऋषिकेश गायकवाड, सतिश बोरुडे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे याचिकेद्वारे केली होती.
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम (३) (१) (अ) अन्वये अपात्र ठरविण्यात यावे अशा तक्रारीच्या दाखल याचिकेवर आज सोमवार दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या समोर सुनावणी होऊन श्री. द्विवेदी यांनी तक्रारदारांना तक्रार दाखल करता येत नसल्याचे सांगत याचिका फेटाळली आहे. शिवाय भविष्यात अधिकार नसताना याचिका दाखल करणाऱ्यांवर दंड करण्याच्या सूचनाही दिल्या त्यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी मनोहर पोटे यांच्या वतीने अँड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले.
नमूद आजच्या या सुनावणीकडे श्रीगोंदा शहर तसेच तालुक्याचे लक्ष लागले होते. मनोहर पोटे यांनी ३१ डिसेंबर २०१८ रोजी आमदार बबनराव पाचपुते गट सोडत काँग्रेस मध्ये प्रवेश करून, काँग्रेस तर्फे पत्नी सौ. शुभांगी पोटे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविली होती. त्यात त्या विजयी देखील झाल्या होत्या. याचे पडसाद तालुका पातळीवर उमटले होते.
नमूद याचिका फेटाळल्याने पोटे दाम्पत्य तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांसह पोटे समर्थकांमध्ये उत्साह दिसून आला.
स्रोत:(अधिकृत स्रोतांकडील माहिती)
