दिनांक १३ एप्रिल,श्रीगोंदा:
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात येणार आहे.covid-19 या विषाणूचा राज्यासह देशात मोठा प्रादुर्भाव असल्याने आंबेडकरी समाजाने परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःहून जयंती घरात साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात जेष्ठ आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकर यांनीही तमाम आंबेडकरी अनुयायांना तसे निर्देश दिल्याचे सर्वश्रुत आहे.
मात्र,हे सर्व स्पष्ट असतानाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वत्रिक करण्यासंदर्भात प्रशासनामार्फत कोणतीही पूर्व सूचना किंवा कल्पना न देता, तालुक्यातील सुमारे २५ आंबेडकरी कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ नुसार प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना या नोटीस द्वारे कळविण्यात आले आहे की,कोणीही सार्वजनिक जागेवर एकत्र येऊन प्रतिमा पूजन किंवा मिरवणूक काढणार नाही.तसे झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अशी नोटीस देण्यासंदर्भात कोणाचीही काही हरकत नाही.मात्र,फक्त आंबेडकरी कार्यकर्त्यांनाच जयंतीच्या अनुषंगाने अश्या पद्धतीने नोटीस देने दुटप्पीपणा चे धोरण असल्याचे जाणवत आहे.
कारण covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिनांक २२ मार्च २०२० रोजी जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. दरम्यान, आदेश जारी झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय सण,उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंत्या झाल्या आहेत. मात्र, संबंधितांना कोणतीही लेखी सूचना किंवा प्रतिबंधत्मक आदेश श्रीगोंदा पोलीस स्टेशन किंवा स्थानिक प्रशासनामार्फत दिल्याचे नमूद नाही. निव्वळ आंबेडकरी समाजाला या नोटिसा देणे ही बाब संभ्रमात टाकणारी असल्याचे दिसत आहे.
मुळात आंबेडकरी कार्यकर्ता हा अनुशासन पाळणारा आहे.असे असताना दुय्यम वागणूक दिल्या पद्धतीने जाणीवपूर्वक गेल्या तीन आठवड्यात कोणत्याही इतर कार्यक्रमांना नोटीस न बजावता. फक्त आंबेडकरी कार्यकर्त्यांना किंवा समाजाला नोटिसा बजावने, यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन प्रशासनाची भूमिका ही श्रीगोंदयातील आंबेडकरी कार्यकर्त्याला किंवा समाजाला संशयिताच्या दायऱ्यात उभा करणारी भूमिका असल्याची यातून समोर येत आहे.
या कारवाई विषयी प्रशासनास विचारणा केली असता.वरिष्ठांकडुन कारवाई करण्याची सूचना दिल्या असल्याचे त्यांच्याकडून समजते आहे.
