रयतच्या उत्तर विभागीय अधिकारी पदी प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांची निवड..

दिनांक २६ ऑगस्ट,श्रीगोंदा:

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा संकुलातील महादजी शिंदे विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य तुकाराम पांडुरंग कन्हेरकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांडगाव ता. श्रीगोंदा या शाखेच्या उभारणीमध्ये जडणघडणीमध्ये आणि विकासामध्ये श्री. कन्हेरकर यांचा सिंहाचा वाटा होता. विना अनुदानित तत्त्वावर चालू केलेल्या या शाखेत उपशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यांची कार्यकुशलता तसेच नागरिकांना, सर्व समाज घटकांना तसेच शाखेतील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत घेऊन त्यांची कामाची पद्धती आहे. यामुळे अल्पावधीतच त्यांच्या कार्याच्या रूपांतरण वृक्षांमध्ये झाले. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि अफाट कार्यक्षमतेमुळे त्यांनी चांडगाव, बेलवंडी, नगर आणि श्रीगोंदा शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शाखांचा तसेच रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवला. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक शाखांचा विस्तारही केला.

शालेय अभ्यासक्रमाबरोबरच त्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, एन एम एम एस ,राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, एन.टी.एस. विज्ञान विषयांमध्ये पारंगत विद्यार्थ्यांसाठी इंस्पायर अवार्ड योजना इत्यादी उपक्रमांच्या माध्यमांतून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उत्तर विभागात रयत शिक्षण संस्था स्तरावर विविध शाखांमधून काम करताना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच या शाखांमध्ये आधुनिक इमारती च्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करून, ग्रामीण भागात विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची सोय केली.

‘शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म’ या कर्मवीरांच्या व्रताची जोपासना केली. त्यांचं बहुआयामी व्यक्तित्व आणि अष्टपैलू कार्यशैलीमुळे रयत शिक्षण संस्थेने आपल्या उत्तर विभागाच्या अहमदनगर, बीड, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी विभागीय अधिकारी म्हणून निवड केली आहे.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, राजेंद्र फाळके, जामखेडचे आमदार रोहित पवार उत्तर विभागातील सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तसेच श्रीगोंद्यातील मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य तुकाराम दरेकर, रवीशेठ दंडनाईक विभागातील रयत सेवक यांनी अभिनंदन केले.

स्रोत:(सचिन झगडे,सर यांनी प्रसिध्दीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading