विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची बीज रुजविणे आणि उपेक्षित अनाथ मुलांची भूक भागवण्याच्या भावनेतून एक मुठ अनाथासाठी हा उपक्रम चालू वर्षी अग्नीपंख फौडेशनने तालुक्यातील २९ शाळा, विद्यालयात राबविला या उपक्रमात १३ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला १४० क्विंटल धान्य जमा झाले हे धान्य राज्यातील नगर येथील स्नेहालयासारख्या वसतीगृहांना प्रत्येकी एक टन वाटप केले या उपक्रमात आंतरराष्ट्रीय धावपटू ललीता संदीप बाबर काष्टी येथील साईसेवा प्रतिष्ठान मांडवगण येथील बोरूडे मळा तसेच आढळगाव येथील महिलांनी योगदान दिले आहे हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची सुचना हजारो पालकांनी केली आहे.
धान्यरुपी सेवा दिलेल्या संस्था. स्नेहालय, सावली, अनामप्रेम (नगर), महात्मा फुले अश्रामशाळा (घारगाव), बाबा आमटे (श्रीगोंदा), हरिओम (टाकळी खंडेश्वरी), आदिवासी प्रवर्तक (बारडगाव), ज्ञानप्रबोधिनी (कोर्टी), सहारा बाल ग्राम (गेवराई), स्नेह सेवासदन (औसा लातूर), सार्थक (आंबळे), अविश्रांती बालसदन (दौंड), निवारा अनाथालय (जामखेड), शाहू बोर्डीग (सातारा)..
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
