दिनांक ४ डिसेंबर(काष्टी,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या गुटख्याच्या गोडाऊन वर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि ०३ डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना काष्टी येथील वाघजाई चौकातील जाणता राजा पान सेंटर, शिवदत्त पान सेंटर या टपरीमध्ये तसेच इतर ठिकाणी गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती गुप्तमाहितीदाकडून मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजनकर, पो कॉ किरण बोराडे, पो.कॉ. प्रताप देवकाते, पो.कॉ. अमोल आबजे, पो.कॉ. कुलदीप घोळवे, पो.कॉ. किरण भापकर, पो.कॉ. संतोष कोपनर, पो.कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ. दादासाहेब टाके, पो.कॉ. गोकुळ इंगवले यांच्या पथकाने काष्टी येथे जाणता राजा पान सेंटर, शिवदत्त पान सेंटर या टपरीवर जाऊन छापा टाकत विक्री करीता साठवून ठेवलेला विमल, माणिकचंद, हिरा गुटखा, सुगंधी तंबाखू असा २९५८३४/- रुपये किंमतीचा तसेच विना नंबरची मारुती सुझुकी इको कंपनीची सुमारे पाच लाख रुपये किंमतीची चारचाकी गाडी सह सुमारे ७,९५,८३४/- रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पो. कॉ. अमोल आजबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन पांडुरंग कोकाटे रा. संतवाडी, काष्टी, ता. श्रीगोंदा व दीपक नाना टकले रा. काष्टी, ता. श्रीगोंदा या दोन जणांना ताब्यात घेतले असून, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हिरा मसाला, सुगंधी तंबाखू हे मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचे माहित असूनही विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आल्याने भा.द.वि. कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ चे कलम २६ (२)(i), २६ (२)(iv), २६ (३)(d) व (e) सहवाचन कलम ३० (२)(a), सहवाचन मा अन्न सुरक्षा आयुक्त यांची अधिसूचना क्र. ७९४/२०१८/७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर हे पुढील तपास करीत आहेत.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल तक्रार)
