दिनांक ४ डिसेंबर, श्रीगोंदा/पुणे:
बाजार समित्यांमधील गैरप्रकार बंद करावे या मागणीसाठी २ डिसेंबर पासून सुरू आहे. पणन संचालकांनी काहीच कार्रवाई केली नसल्यमुळे शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धरणे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नगर , पुणे, परभणी, लातूर, हिंगोली, धुळे, जळगाव, नाशीक, बीड, जालना, ठाणे आदी जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सहभागी झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्यांनी आप आपल्या जिल्ह्यात कशा प्रकारे लूट केली जाते. या दिलेल्या माहितीनुसार जिल्हा निहाय माहितीचे निवेदन पणन संचालक सतीशकुमार सोनी यांना दिले. शेतकरी संघटनच्या शिष्टमंडळाने पणन संचालकांशी चर्चा केली. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधकांना पत्रद्वारे सुचना देण्याचे अश्वासन दिले. मात्र, काही ठोस कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले आहे.
धरणे आंदोलन प्रसंगी अनिल चव्हाण, खांडबाराव पोले, गजानन देशमुख, प्रकाश पाटील, देवीप्रसाद ढोबळे, ब.ल. ताम्हस्कर, रुपेश शंके यांची भाषणे झाली.
स्रोत:(अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
